पोस्ट्स

शेतकऱ्याने पत्र लिहून मानले मुंडेंचे आभार!

इमेज
  एका शेतकऱ्याचे निवेदन, धनंजय मुंडेंची तत्परता अन संपूर्ण देशात झाली योजना लागू! प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन  योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणाली साठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजारांचे अनुदान शेतकऱ्याने पत्र लिहून मानले मुंडेंचे आभार! मुंबई (दि. 20) - अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, धनंजय मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मुंडेंच्या या तत्परतेने सबंध देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले! धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदन कर्त्या शेतकऱ्यासह असंख्य शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.  झाले असे की, कृषिमंत्री धनंजय मुंडे हे मागील महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी श्री मुंडे यांना निवेदन दिले होते. संत्रा फळ पिकाची गळती झाली असून, फळ बागांना स्वयंचलित ठिबक

श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली

इमेज
  श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली      नागापुर ते कपीलधार ४७ व्या पदयात्रेस मंगळवारी प्रारंभ                          पायी दिंडी मध्ये श्री गुरुराज माऊली.. मन्मथ माऊलीचा जयघोष परळी: श्री गुरुराज माऊली.. मन्मथ माऊली ..असा जयघोष करत परळी तालुक्यातील नागापूर येथून पायी दिंडी श्रीक्षेत्र कपिलधार कडे मंगळवारी शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली निघाली       कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त दरवर्षी नागापुर ते श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रा आयोजित करण्यात येते. यावर्षी ४७ व्या वर्षीही ही परंपरा अखंडीत राहणार असून श्री गुरू ष.ब्र.१०८ राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु ष.ब्र.१०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्राम दैवत श्री नागनाथ मंदिर नागापुर येथुन मंगळवारी निघाली.नागापूर येथे पायी दिंडी सोहळ्यानिमित्त शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्वागत माजी सरपंच प्रभू आप्पा तोंडारे  यांनी केले व  पायी दिंडी सोबत नागापूरच्या सरपंच सौ.मंग

इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी परळीत

इमेज
  इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी परळीत  परळी :  इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत  डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्ष सौ. रचना मालपाणी इनरव्हिल क्लब  ऑफ परळी च्या वार्षिक अहवाल तपासण्या साठी परळी येथे २३ नोव्हेंबर ला सकाळी १० वाजता येत आहेत. गेले 25 वर्षा पासून परळी येथील इनरव्हिल क्लब सामाजिक कार्य करत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वार्षिक अहवाल तपासण्या साठी डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपानी येत आहे. डिस्टीक चेअरमन च्या उपस्थितीत  परळी येथे सकाळी आर्य हॉटेल येथे  सकाळी 10 वाजता मिटिंग  ठेवण्यात आली आहे.  या बैठकीस परळी इनरव्हील क्लब च्या सर्व सदस्यांनी हजर रहावे, असे आवाहन परळी इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष श्रीमती विद्या गुजर यांनी केले आहे.

बीड जिल्हा बंजारा समाज यांच्या वतीने सत्कार

इमेज
  वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब (पप्पू )चव्हाण यांनी स्वीकारला पदभार  बीड (प्रतिनिधी) :- माजी मंत्री पंकजाताईं मुंडे व खा. डॉ. प्रिंतमताई मुंडे यांचे विश्वासू परळी तालुक्यातील कौठळी येथील बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे. वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पप्पू चव्हाण यांनी पदभार स्वीकारला व कामकाज बाबत माहिती समजून घेतली. तसेच समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्री शिंदे यांनी पदभार देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान बीड जिल्हा बंजारा समाज यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान,माजी मंत्री पंकजाताईं मुंडे व खा. डॉ. प्रिंतमताई मुंडे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून जबाबदारी दिली तो विश्वास जन सामान्यांची कामे करून सार्थ करून दाखवू असे चव्हाण यांनी म्हटले आहे.              वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी

व्हाॅईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचा समारोप

इमेज
  लोकशाही टिकविण्यासाठी चौथा स्तंभ महत्वाचा : पृथ्वीराज चव्हाण व्हाईस ऑफ मीडियाची वैश्विक झेप कौतुकास्पद - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्हाॅईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचा समारोप  (गदिमा सभागृहातून) बारामती, दि. १९ :  चौथा स्तंभ म्हणून असलेल्या मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन तंत्रज्ञानाचे पत्रकारितेसमोर आव्हान आहे. जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. लिखित वर्तमानपत्राच्या अस्तित्व बाबतीत साशंकता आहे. अशा परिस्थितीत वाईस ऑफ इंडियाची कामगिरी अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी येथे काढले.दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला.  समारोप सत्राचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समाजसेवक पोपटराव पवार, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, शिवराज पाटील, राणा सुर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले, व्हॉइस ऑफ मीडियाने की तीन वर्षांत मोठे रा

श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन

इमेज
श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन   परळी (प्रतिंनिधी): श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे स्नेहमिलन रविवार, दि. १९ रोजी श्रद्धा मंगल कार्यालयात हर्षोल्हासात संपन्न झाले. सर्वप्रथम सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेत राष्ट्रगीत व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात अगदी आनंदाने झाली. यात तत्कालीन अ, ब, क, ड या चार तुकड्यांमध्ये माजी शिक्षकांनी ३० मिनिटांचा तास भरविला व अध्यापन केले. शाळेतील छोट्या मध्यांतर मध्ये चिवडा, खारे शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे, लेमन गोळ्या, शेंगदाणा चिक्कीची लज्जतसुद्धा माजी विद्यार्थ्यानी चाखली.  नाश्त्यानंतर पुढील मुख्य कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा मंगल कार्यालय येथे झाली. सर्व मान्यवर गुरुजनांचे यावेळी पाद्यपुजन करून स्वागत करण्यात आले. शाळेतील आजी- माजी शिक्षकांमध्ये रोडगे मॅडम, टाले मॅडम, चांडक मॅडम, तोतला मॅडम, हजारे मॅडम, मुंदडा सर, नानेकर सर, चाटे सर, रोडे सर, सौंदळे सर, तांबडे सर, खरबड सर, पोहनेरकर सर, देशमाने सर, जुनाळ सर, चौधरी सर, नाईकवाडे सर, ढाकणे सर, देशमुख सर, गजाकोष सर, मोगरकर सर, कांबळे सर,

व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन;१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा

इमेज
  पत्रकारांनी भरगच्च  ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ! व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन;१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा बारामती दि.१९...दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यासह १४ ठराव यावेळी मांडण्यात आले. हात उंचावून पत्रकारांनी भरगच्च असलेले  "गदिमा सभागृह" या ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ठरले! या प्रसंगी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,  राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांच्यासह प्रदेश टीम, विभागीय अध्यक्ष, आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.  व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संजय पडोळे यांनी ठराव वाचन या प्रसंगी केले. यात १. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा. २. रेडिओ टीव्ही सोशल मिडिया कर्मचाऱ्यांना श्रमिक पत्रकार मान्यता द्यावी. ३. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्य

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळा

इमेज
  राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोअनुष्ठान समितीच्या वतीने श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार दिंडी सोहळ्याचे स्वागत  परळी वैजनाथ / प्रतिनिधी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळा श्री गुरू वेदांताचार्य, शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री वैजनाथ नगरी परळी येथून निघालेल्या पायी दिंडीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. श्री गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे विश्वस्त तथा वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त श्री.विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्री गुरू वेदांताचार्य,शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज  साखरखेर्डेकर,ष.ब्र 108 सिध्दचैतन्य महाराज यांचे

उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान आयर्न लेडी म्हणजे इंदिरा गांधी- संभाजी मुंडे   उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी  परळी प्रतिनिधी -      भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान व आयर्न लेडी म्हणून ख्याती असलेल्या इंदिरा गांधी या देशासाठी एक आदर्शच असल्याचे प्रतिपादन टीव्ही 9 चे रिपोर्टर संभाजी मुंडे यांनी केले. परळी उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.        भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 101 वी जयंती उपजिल्हा रुग्णालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली.19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या. ‘गुंगी गुडिया’ म्हणून सुरुवातीला विरोधकांनी हिणवलेल्या इंदिरा गांधी यांना त्याच विरोधकांनी पुढे ‘दुर्गा’ म्हणून संबोधले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती परळी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही 9 चे प्रतिनिधी संभाजी मुंडे ,पत्रकार विकास वाघमारे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या

सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार

इमेज
खा.शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा-सौ.सुदामती गुट्टे   सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार  परळी, प्रतिनिधी... राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्याकडुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण पवार यांचा रत्नदिप निवासस्थानी सत्कार करण्यात आला.  अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील रहिवासी परळी विधानसभा अध्यक्षपदी किरण पवार यांची नुकतीच निवड झाली असुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्या रत्नदिप या निवासस्थानी किरण पवार यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून इतोचित सत्कार जेष्ठनेते सय्यद अब्दुल समद,शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख,तालुका उपाध्यक्ष भागवत गित्ते,युवानेते सय्यद फरोज,राम जाधव, नामदेव, रामप्रसाद सोळंके,भगवान सोळंके, हनुमंत बाप्पा सोळंके, सुंदरराव सोळंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला.       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले कि,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गावाग

MB NEWS Live:व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचे थाटात उद्घाटन

इमेज
  व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज  - विजय वडेट्टीवार निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी : वडेट्टीवार अधिवेशनाला पत्रकारांची उच्चांकी उपस्थिती ...  व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचे थाटात उद्घाटन (ग.दि.मा.सभागृह) बारामती दि.१८ ...... आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास लिहिले गेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. लेखणीला मर्यादा आल्याचे जाणवते.  कुणालाही झुकविण्याची ताकद व्हाॅईस ऑफ मीडियात आहे. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज असल्याचे  गौरवोद्गार विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढले.       पत्रकारांच्या न्याय हक्काचं व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचा राज्याचे शिखर अधिवेशनाचे  शानदार उद्घाटन  ग.दि.मा. सभागृहात भरगच्च उपस्थितीत पार पडले.  उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार लाभले. तर सुनेत्रावहिनी अजितदादा पवार,   हिंगोलीचे खासदार हेमंत पा

सुयश: अभिनंदन

इमेज
  गार्गी मोगरकर चे ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक परळी वैजनाथ शंकरआप्पा मोगरकर सर यांची नात गार्गी अमित मोगरकर हिने हैद्राबाद येथील नुकत्याच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक मिळवत यश संपादन केले आहे. कु गार्गी हिने 29 शाळेतील विद्यार्थ्यांमधून हे यश संपादन केले आहे. परळी येथील सरस्वती विद्यालयाचे माजी शिक्षक, जेष्ठ पत्रकार शंकरआप्पा मोगरकर सर यांचे चिरंजीव अमित व स्वाती मोगरकर यांची कु गार्गी ही कन्या असून ती हैद्राबाद येथील दिल्ली वर्ल्ड स्कुल येथे इयत्ता चौथीत शिकत आहे.  गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयासाठी 31 ऑक्टोबर ला ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आल्या. हैद्राबाद येथील 29 नामांकित शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेतला होता. कु गार्गी हिने या परीक्षेत सुयश प्राप्त करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. या यशाबरोबरच दिल्ली वर्ल्ड स्कुल, हैद्राबाद च्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बालदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या  स्पर्धेत कु. गार्गी हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कु गार्गी हिला पहिलीपासूनच गणित व विज्ञान या विषयात जास्त आवड आहे. शाळेत घेण्यात येणाऱ्य

मा.श्री.बाळासाहेब(पप्पू) चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन !!!!-●अभिनंदनोत्सुक● गोविंद सोनवणे व मित्र परिवार

इमेज
  हार्दिक अभिनंदन !!!! वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासकीय समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.बाळासाहेब(पप्पू) चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा !!!! ■  दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!!! ■ ●अभिनंदनोत्सुक● गोविंद सोनवणे व मित्र परिवार

मा.श्री.बाळासाहेब(पप्पू) चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन !!!!-●अभिनंदनोत्सुक● गोविंद सोनवणे व मित्र परिवार

इमेज
  हार्दिक अभिनंदन !!!! वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासकीय समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.बाळासाहेब(पप्पू) चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा !!!! ■ दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!!! ■ ●अभिनंदनोत्सुक● गोविंद सोनवणे व मित्र परिवार

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!! ● शुभचिंतक ●सौ. सुदामतीताई रत्नाकरराव गुट्टे ज्येष्ठ नेत्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य

इमेज
स्नेहाचा सुगंध दरवळला.. आनंदाचा सण आला.. एकच मागणे दिवाळी सणाला... सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!! सौ. सुदामतीताई रत्नाकरराव गुट्टे ज्येष्ठ नेत्या-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य.

दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!!! ●शुभचिंतक●राजाभाऊ फड युवा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र

इमेज
  स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला, दीपावलीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!!!! • शुभ चिंतक • राजाभाऊ फड  युवा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम

इमेज
  सामाजिक बांधिलकी जोपासत वंचितांची दिवाळी केली साजरी सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून हा उपक्रम  आज 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी राबविला आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश परळी-परभणी रेल्वे मार्गाचे

इमेज
खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश     परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत. परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्वे निघण्या

हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद

इमेज
 हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास  प्रतिसाद  अंबाजोगाई (प्रतिनीधी)       हवामान बदल व जागतिक तापमान वाढ हे आज अत्यंत महत्वाचे विषय असून त्यानुसार शेतीमध्ये हवामान बदलावर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पिकांचे नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हवामानात होणारा बदल जसे की हरितगृह वायू च्या उत्सर्जनात होणारी वाढ यामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लोरो कार्बन, नायट्रस ऑक्साईड या वायुंचा समावेश होतो.ओझोन थराचा ऱ्हास, तापमान वाढीचा परिणाम म्हणून समुद्र पाणी पातळीमध्ये होणारी वाढ, पावसाचे असमान वितरण, वादळे, पुर,अतिवृष्टी, जंगलतोड, वाढते शहरीकरण, इंधनाचा अतिवापर, दुष्काळ, शेतीमध्ये असंतुलित खतांचा व औषधांचा वाढता वापर इत्यादी कारणांमुळे हवामानात होणारा बदल व त्यामुळे शेती तसेच मानवावर होणारे दुष्परिणामांचा सामना सर्वानाच करावा लागेल, तेव्हा हवामान आधारित शेती व्यवस्थापन करुन वरील समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी करता येतील. दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई मार्फत निक्रा प्रकल्प अंतर्गत  ‘शेतकरी-विद्यार्

किसान सभा पुन्हा रस्त्यावर

इमेज
बलीप्रतिपदेच्या पूर्वदिनी बळीराजाचा आक्रोश ◆शेतकऱ्यांच्या विविध मागणीला घेऊन किसान सभा पुन्हा रस्त्यावर परळी / प्रतिनिधी सर्व प्रजेला समतेची अन् ममतेची वागणूक देणाऱ्या व प्रजेच्या सुखातच स्वतःचे सुख मानणाऱ्या महाबली बळीराजाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बलिप्रतिपदेच्या पूर्व दिनी दि. १३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वा. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा बळीराजाच्या मिरवणुकीसह बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे बळीराजाच्या जीवनावर कीर्तन आंदोलन करण्यात येणार असून या कीर्तन आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेकडून करण्यात येणार आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सत्ता सिंहासनावर बसलेले आधुनिक वामन सर्वपरी सर्वसामान्य रयतेला छळत आहेत, आणि बळीचा वारसा जपणारा खरा शेतकरी मात्र अस्तित्वासाठी धडपडत आहे.सत्ताधारी शेतक-यांचा पुळका दाखवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणाबाजी करतात वास्तवात मात्र उत्पादन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ

मार्गदर्शन शिबिर

इमेज
  अवयवदान हे जीवनदान -डॉ. सुनील कुलकर्णी नांदेड प्रतिनिधी (दिनांक १० नोव्हेंबर २०२३) अवयवदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत दिनांक 9 नोव्हेंबर 23 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर मयूर विहार कॉलनीत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीनिवासजी इनामदार (सेवानिवृत्त मुख्य अभियंता एम एस ई बी) होते तर  प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ .सुनील कुलकर्णी (अति दक्षता विभाग प्रमुख, अश्विनी हॉस्पिटल नांदेड) व  ज्योतीताई पिंपळे ( नेत्र दान समुपदेशक गुरुगोविंद सिंग जी स्मारक रुग्णालय नांदेड) व जेष्ठ नागरिक  चक्रधरजी साले हे उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरेल सुरुवात सौ.  सुरेखा गाजरे यांच्या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व दिवाळी निमित्त धनाची देवता महालक्ष्मी चे  प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर मार्गदर्शन करताना  "आपल्या संस्कृतीमधे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.दानशुर कर्ण हे आदर्श उदाहरण आहे. अन्नदान, विद्यादान, रक्तदान, विधायक व सामाजिक कार्यासाठी संपत्तीचे दान हे तर महत्वाचे आहेच पण सर्वात श्रेष्ठ दान नेत्रदान, अवयवदान व देहदान आहे असे डॉ.सुनील कुल

युवकाची संवेदनशीलता: आपघातग्रस्तांचे वाचले प्राण

इमेज
  युवकाची संवेदनशीलता, अपघातातील व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी केले दाखल, वाचले प्राण परळी वैजनाथ दि.०९ (प्रतिनिधी)           परळी-आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटात गुरुवारी  सायंकाळी ६.३० च्या सुमारास दुचाकीच्या समोर अचानक गाय आली. व जोराची धडक बसून दुचाकीवरील दोघे पडले. येणारे जाणारे फक्त पाहुन पुढे जात होते. संवेदनशील नागरीकांनी दुचाकी बाजूला उभ्या करुन त्यांना रस्त्याच्या बाजूला घेतले पण दवाखान्यात कसे न्यायचे यावर चर्चा सुरू झाली. यात एका युवकांनी आपली दुचाकी उभी करुन तात्काळ त्यांना त्यांच्या दुचाकीवर बसवून स्वतः ती दुचाकी घेऊन दवाखाना जवळ केला. व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.             परळी-आंबेजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीच्या घाटात गुरुवारी (ता.०९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास बबन श्रीखंडे व अरुण श्रीखंडे (दोघे राहणार परभणी) हे दोघे बंधू आपल्या दुचाकीवरून येडशी येथून परळी मार्गे परभणीकडे जात असताना अचानक गाय समोर आली.या गायीला जोराची धडक बसली. यात गाईचे काही नुकसान झाले नाही मात्र  रात्रीची वेळ अगोदर घाट रस्ता व उतार असल्याने दुचाकी वेग

दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे

इमेज
  मुंबईच्या कार्यालयात उत्स्फूर्त स्वागत: डाॅ.संतोष मुंडे यांनी "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे कामकाज घेतले समजुन मुंबईच्या कार्यालयात अनेकांनी केले स्वागत, दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे मुंबई (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या सेवेसाठी अभियानचे उपाध्यक्ष हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध असुन दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. मुंबईच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व दिव्यांगांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.           डॉ. संतोष मुंडे यांनी आज मुंबई येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मित्तल टॉवर नरिमन पॉईंट येथे  ऑफिसला भेट देऊन कामकाज समजून घेतले. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव अभय महाजन, आयुक्त घोडके यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाचे स्वरूप व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली समाजातील दिव्यांग, निराधार,

वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू चव्हाण यांची नियुक्ती

इमेज
  पंकजा मुंडे यांनी दिला बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला न्याय वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू  चव्हाण यांची नियुक्ती _पंकजाताईंचा विश्वास सार्थ करून दाखवू_ परळी वैजनाथ ।दिनांक ०९। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असतात, त्याचीच परिणीती पुन्हा आली. कौठळीच्या बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.  बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला पंकजाताईंनी न्याय दिला अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.   वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी कौठळीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब भाऊराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे आदेश आज शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आले.  नियुक्ती नंतर चव्हाण यांनी आज यशःश्री निवासस्थानी य

परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध

इमेज
परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध परळी/ प्रतिनिधी-           दीपावलीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारस निमित्ताने परळी शहरात विविध ठिकाणी गोवत्स पुजन उत्साहात करण्यात आले. रामरक्षा गोशाळेच्या वतीने वसुबारसेच्या निमित्ताने पुजन करण्यासाठी गोमाता उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.          वसुबारसेच्या निमित्ताने परळी शहराच्या विविध भागांमध्ये गायी-वासरांचे रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पुजन करण्यात आले. घरा-घरामध्ये व्यक्तीगत पूजन झाले. त्याचबरोबर ओद्योगीक वसाहत परिसरातील कोठारी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक गोवत्स पुजन पार पडला. यावेळी गायी-वासरांचे विधीवत पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास बंसल क्लासेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी, औद्योगीक वसाहतीचे चेअरमन रतन कोठारी, वैभव धोंड, हरि मोदाणी, सुनिल फुलारी, दिनेश लोंढे, अनिल जोशी, शैलेष पांडे, सौ. वर्षा जोशी, सागर वेडेकर, अनंत कुलकर्णी, रघुवीर राडीकर आदींसह अनेकजण उपस्थित होते. परळी शहरातील औद्योगिक वसाहत, शंभू महादेव मंदिर, देशमुख यांचा वाडा, रामरक्षा गोशाळा अंबाजोगाई रोड