सुयश: अभिनंदन

 गार्गी मोगरकर चे ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक




परळी वैजनाथ

शंकरआप्पा मोगरकर सर यांची नात गार्गी अमित मोगरकर हिने हैद्राबाद येथील नुकत्याच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक मिळवत यश संपादन केले आहे. कु गार्गी हिने 29 शाळेतील विद्यार्थ्यांमधून हे यश संपादन केले आहे.

परळी येथील सरस्वती विद्यालयाचे माजी शिक्षक, जेष्ठ पत्रकार शंकरआप्पा मोगरकर सर यांचे चिरंजीव अमित व स्वाती मोगरकर यांची कु गार्गी ही कन्या असून ती हैद्राबाद येथील दिल्ली वर्ल्ड स्कुल येथे इयत्ता चौथीत शिकत आहे.  गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयासाठी 31 ऑक्टोबर ला ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आल्या. हैद्राबाद येथील 29 नामांकित शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेतला होता. कु गार्गी हिने या परीक्षेत सुयश प्राप्त करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. या यशाबरोबरच दिल्ली वर्ल्ड स्कुल, हैद्राबाद च्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बालदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या  स्पर्धेत कु. गार्गी हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कु गार्गी हिला पहिलीपासूनच गणित व विज्ञान या विषयात जास्त आवड आहे. शाळेत घेण्यात येणाऱ्या विज्ञानप्रदर्शनात विविध प्रयोग सादर करीत तिने यापूर्वीही यश प्राप्त केले आहे. संशोधक बनण्याचे स्वप्न असल्याचे गार्गी हिने या यशाबबद्दल बोलताना सांगितले.कु गार्गी हिने स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !