सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम

 सामाजिक बांधिलकी जोपासत वंचितांची दिवाळी केली साजरी



सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून हा उपक्रम  आज 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी राबविला आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.


दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमीच अंधार असतो. यामुळेच मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजुंना कपडे, मिठाईचे वाटप केले. 


देणाऱ्यांना देत जावे, घेणार्याने घेत जावे या उक्तीप्रमाणेच परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून  आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून अनेक लोकांच्या चेहर्यावरच्या हास्याचे कारण ते बनत आहेत. सणोत्सवाच्या दिवशी कामावर असलेल्या गरीब व होतकरु लोकांना व ज्येष्ठांना उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. 

मौजे परचुंडी येथील गरीब कुटूंबातील सुमारे 40 कुटुंबांना साडी, गरा,मैदा,साखर, चनादाळ, पामतेल इ  प्रकारचे साहित्य तसेच एक भेटवस्तु देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे,युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे,सरपंच सौ मीनाताई गुरूलिंग नावंदे,व्यंकट गडदे पाटील,सुभाष नावंदे,गुरूलिंग नावंदे,सुनील नावंदे,बलभीम थोरात,बाबुराव थोरात कमलाकर नावंदे, गणेश पत्रावळे यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्यांनी एक आदर्श उपक्रम राबविला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !