खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश परळी-परभणी रेल्वे मार्गाचे

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश  

परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण

परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.

परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत.

परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्वे निघण्या अगोदरपासून ती या स्थानकावरुन पुढे जाईपर्यंत या रेल्वेला येथे थांबवले जाते.तसेच लातूरकडील मार्गावर लातूर रोडवर रेल्वे तासनतास थांबवल्या जातात. यासाठी लातूर रोड ते परळी, परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक होते. यातील परळी- परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यास रेल्वेला आता या कोणत्याही स्थानकावर थांबावे लागणार नाही.शिवाय दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वेची संख्याही वाढू शकते. यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे चंदुलाल बियाणी, जी. एस. सौंदळे आदींनी केले आहे.

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश
जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळी-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, यासाठी वेळोवेळी रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यामुळे सदर मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गाचे दुहेरीकरण जलद गतीने होणार असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !