श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन

श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन  


परळी (प्रतिंनिधी): श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे स्नेहमिलन रविवार, दि. १९ रोजी श्रद्धा मंगल कार्यालयात हर्षोल्हासात संपन्न झाले. सर्वप्रथम सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेत राष्ट्रगीत व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात अगदी आनंदाने झाली. यात तत्कालीन अ, ब, क, ड या चार तुकड्यांमध्ये माजी शिक्षकांनी ३० मिनिटांचा तास भरविला व अध्यापन केले. शाळेतील छोट्या मध्यांतर मध्ये चिवडा, खारे शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे, लेमन गोळ्या, शेंगदाणा चिक्कीची लज्जतसुद्धा माजी विद्यार्थ्यानी चाखली. 

नाश्त्यानंतर पुढील मुख्य कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा मंगल कार्यालय येथे झाली. सर्व मान्यवर गुरुजनांचे यावेळी पाद्यपुजन करून स्वागत करण्यात आले. शाळेतील आजी- माजी शिक्षकांमध्ये रोडगे मॅडम, टाले मॅडम, चांडक मॅडम, तोतला मॅडम, हजारे मॅडम, मुंदडा सर, नानेकर सर, चाटे सर, रोडे सर, सौंदळे सर, तांबडे सर, खरबड सर, पोहनेरकर सर, देशमाने सर, जुनाळ सर, चौधरी सर, नाईकवाडे सर, ढाकणे सर, देशमुख सर, गजाकोष सर, मोगरकर सर, कांबळे सर, मैद सर, बेजगमवार यांच्यासह १२८ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

शिक्षकांच्या मनोगतात आनंदी मन व सुदृढ प्रकृती सांभाळण्याबाबत नानेकर सरांनी मोलाचे विचार मांडले. देशमाने सरांनी वसुंधरेचे व पर्यावरणाचे जतन करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कवडे सरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सौंदळे सरांनी ऊर्जेच्या संवर्धनाबाबत विचार मांडले तर तांबडे सरांनी दैनंदिन कामकाजात नैराश्याने ग्रासून न जाता सकारात्मकतेने वाटचाल करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात सुरुचि भोजनासह सांघिक खेळांचे देखील आयोजन करण्यात आले. यात माजी विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सोनी व राहुल गिरी यांनी केले. प्रास्ताविक अजित लिंबकर व वैभव झरकर यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन स्वानंद भंडारे व अर्चना मैड यांनी केले. स्नेह-मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !