हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद

 हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास  प्रतिसाद 




अंबाजोगाई (प्रतिनीधी)

  

   हवामान बदल व जागतिक तापमान वाढ हे आज अत्यंत महत्वाचे विषय असून त्यानुसार शेतीमध्ये हवामान बदलावर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पिकांचे नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हवामानात होणारा बदल जसे की हरितगृह वायू च्या उत्सर्जनात होणारी वाढ यामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लोरो कार्बन, नायट्रस ऑक्साईड या वायुंचा समावेश होतो.ओझोन थराचा ऱ्हास, तापमान वाढीचा परिणाम म्हणून समुद्र पाणी पातळीमध्ये होणारी वाढ, पावसाचे असमान वितरण, वादळे, पुर,अतिवृष्टी, जंगलतोड, वाढते शहरीकरण, इंधनाचा अतिवापर, दुष्काळ, शेतीमध्ये असंतुलित खतांचा व औषधांचा वाढता वापर इत्यादी कारणांमुळे हवामानात होणारा बदल व त्यामुळे शेती तसेच मानवावर होणारे दुष्परिणामांचा सामना सर्वानाच करावा लागेल, तेव्हा हवामान आधारित शेती व्यवस्थापन करुन वरील समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी करता येतील.


दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई मार्फत निक्रा प्रकल्प अंतर्गत  ‘शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये "हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापन" या विषयावर शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुहास पंके (कृषी विस्तार शास्त्रज्ञ) यांनी सांगितले की, शेती पद्धतीत झालेला बदल पूर्वीची शेती व आताची शेती काळानुरूप यामधील फरक व यावर होणारा हवामान बदलाचा प्रभाव जिल्ह्यामध्ये पर्जन्याचे असमान वितरण, सरासरी पेक्षा कमी पर्जन्य, मान्सून पावसाचे होणारे आगमन, पावसामध्ये खंड अशी परिस्थिती दिसून येत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकाचे व्यवस्थापन करता यावे, पिकाची नुकसान पातळी कमी करता यावी यासाठी हवामान बदलाच्या अनुषगाने शेती करावी लागेल. निक्रा प्रकल्प अंतर्गत निवड केलेल्या राजेवाडी गावातील शेतकरी व कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) चे विद्यार्थी यांच्या मध्ये सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख(प्रकल्प समन्वयक, निक्रा), कृष्णा कर्डीले (प्रकल्प सहसमन्वयक, निक्रा) यांची उपस्थिती होती.यावेळी झालेल्या शेतकरी विद्यार्थी सुसंवाद मध्येहवामान बदलावर आधारित निक्रा प्रकल्प अंतर्गत निवडण्यात आलेल्या राजेवाडी गावामध्ये केलेल्या विविध कामाची माहिती बालाजी बोबडे (सहसंशोधक, निक्रा प्रकल्प) यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने माती परिक्षण आधारित खत व्यवस्थापन,हवामान अनुकल व सुधारित वाणांचा पेरणीसाठी वापर, स्थानिक हवामानाशी सुसंगत आंतरपीक पद्धतीचा अवलंब, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेळ्या मध्ये खनिज चाटण विटांचा वापर, परसबागेतील कुकुटपालन, बांधबंधिस्ती, कूपननलिका पुनर्भरण या कामामुळे शेतकऱ्यांनाझालेल्या फायद्याविषयी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला तसेच शेतमालाला योग्य दर न मिळणे, शेतीशी निगडित विविध प्रश्न यावर उपाय म्हणून गटाने एकत्र येवून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचीकल्पनायावेळी विद्यार्थ्यांनीव्यक्त केली. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शेतकरी यांनी उत्स्फूर्तपणे चर्चा करत सहभाग नोंदविला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार