युवकाची संवेदनशीलता: आपघातग्रस्तांचे वाचले प्राण

 युवकाची संवेदनशीलता, अपघातातील व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी केले दाखल, वाचले प्राण


परळी वैजनाथ दि.०९ (प्रतिनिधी)

          परळी-आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटात गुरुवारी  सायंकाळी ६.३० च्या सुमारास दुचाकीच्या समोर अचानक गाय आली. व जोराची धडक बसून दुचाकीवरील दोघे पडले. येणारे जाणारे फक्त पाहुन पुढे जात होते. संवेदनशील नागरीकांनी दुचाकी बाजूला उभ्या करुन त्यांना रस्त्याच्या बाजूला घेतले पण दवाखान्यात कसे न्यायचे यावर चर्चा सुरू झाली. यात एका युवकांनी आपली दुचाकी उभी करुन तात्काळ त्यांना त्यांच्या दुचाकीवर बसवून स्वतः ती दुचाकी घेऊन दवाखाना जवळ केला. व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

            परळी-आंबेजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीच्या घाटात गुरुवारी (ता.०९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास बबन श्रीखंडे व अरुण श्रीखंडे (दोघे राहणार परभणी) हे दोघे बंधू आपल्या दुचाकीवरून येडशी येथून परळी मार्गे परभणीकडे जात असताना अचानक गाय समोर आली.या गायीला जोराची धडक बसली. यात गाईचे काही नुकसान झाले नाही मात्र 

रात्रीची वेळ अगोदर घाट रस्ता व उतार असल्याने दुचाकी वेगात होती यामुळे या गाईला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे खाली पडले.व सिमेंटचा रस्ता असल्याने मोठी दुखापत झाली. रस्त्यावरुन ये-जा करणारे कोणीही थांबायला तयार नव्हते यांच्यावर तात्काळ उपचार झाले. त्यांना पैसे आहेत का लागणार आहेत का ? याची चौकशी केली. नातेवाईकांनी फोनवरून निलेश देशमाने यांचे आभार मानले. या कृतीमुळे निलेश देशमाने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार