किसान सभा पुन्हा रस्त्यावर

बलीप्रतिपदेच्या पूर्वदिनी बळीराजाचा आक्रोश



◆शेतकऱ्यांच्या विविध मागणीला घेऊन किसान सभा पुन्हा रस्त्यावर


परळी / प्रतिनिधी


सर्व प्रजेला समतेची अन् ममतेची वागणूक देणाऱ्या व प्रजेच्या सुखातच स्वतःचे सुख मानणाऱ्या महाबली बळीराजाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बलिप्रतिपदेच्या पूर्व दिनी दि. १३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वा. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा बळीराजाच्या मिरवणुकीसह बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे बळीराजाच्या जीवनावर कीर्तन आंदोलन करण्यात येणार असून या कीर्तन आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेकडून करण्यात येणार आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


सत्ता सिंहासनावर बसलेले आधुनिक वामन सर्वपरी सर्वसामान्य रयतेला छळत आहेत, आणि बळीचा वारसा जपणारा खरा शेतकरी मात्र अस्तित्वासाठी धडपडत आहे.सत्ताधारी शेतक-यांचा पुळका दाखवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणाबाजी करतात वास्तवात मात्र उत्पादन खर्चात दुपटीपेक्षा

जास्त वाढ झाली. किफायतशीर हमीभावाचे भिजत घोंगडे अजून तसेच ताटकळत आहे. याउपर किसान सन्मानच्या नावाने दोन हजार रुपयांचा आवळा देऊन हमी भाव पाडून कवळा काढण्याचा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी राबवला आहे. 'भीक नको कुत्रे आवर' दोन हजाराचा सन्मान नको किफायतशीर हमीभाव हवा अशी मागणी करत आहे. पाऊस कमी पडला. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना पैसेवारी सुद्धा पत्रास टक्क्याच्या आत असताना जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित होत नाही ना पिक विमा अग्रीम घोषित होऊनही मिळत नाही. सरकारमधील पक्षांना निवडणुकीचे वेद लागले आहेत. निवडणुकीचे डावपेच आखण्यात सर्व राजकारणी दंग आहेत. कुणालाच शेतक-यांची चाड नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना वाचा फोडण्यासाठी बळीराजाच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आखील भारतीय किसान सभा पुन्हा रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बळीराजा मिरवणूक काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा जीवनावर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आंदोलन सोमवार दि 13 रोजी करणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे,जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. काशिराम सिरसाट,कॉ. दत्ता डाके,कॉ. भगवान बडे, कॉ. जगदीश फडताडे, कॉ. दादासाहेब सिरसाट यांनी दिली आहे.

●●●●●●●●●●●●

*किसान सभेकडून करण्यात आलेल्या मागण्या*


१)सोयाबीन सारख्या अल्प मुदती पिकाचे पिक कापणी प्रयोगही पूर्ण झालेले आहेत. म्हणून या सर्व पिकांचा अंतिम पीकविमा तत्काळ देवून अडचणीतल्या शेतकन्याला दिलासा द्यावा. तसेच तूर, कापसासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी तातडीने आग्रीम वाटप करावे.


२) गुरांवरील लम्पी या संसर्गजन्य रोगाचा प्रकोप पाहता चारा छावण्यापेक्षा चारा डेपो ची सुरुवात करावी. व चारा टंचाईवर मात करण्यासाठी कोरडे पडलेले धरण क्षेत्र चारा पिकासाठी गाळपेरा करण्याची परवानगी द्यावी.


३) शेतकऱ्यांना किफायतशीर हमीभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन, कापूस आयातीवर कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावे व शासनाने घोषित केलेला हमीभाव पदरात पडून देण्यासाठी या पिकांची आठ दिवसाच्या जात शासकीय खरेदी सुरु करावी.


४) दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अडचणीतील शेतकऱ्यांना NDRF च्या निधीतून दुष्काळी मदत जाहीर करावी.


५) अवर्षण स्थिती पाहता शेतकन्याची सर्व पीक कर्ज माफ करावीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार