परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध

परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध



परळी/ प्रतिनिधी-

          दीपावलीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारस निमित्ताने परळी शहरात विविध ठिकाणी गोवत्स पुजन उत्साहात करण्यात आले. रामरक्षा गोशाळेच्या वतीने वसुबारसेच्या निमित्ताने पुजन करण्यासाठी गोमाता उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. 


        वसुबारसेच्या निमित्ताने परळी शहराच्या विविध भागांमध्ये गायी-वासरांचे रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पुजन करण्यात आले. घरा-घरामध्ये व्यक्तीगत पूजन झाले. त्याचबरोबर ओद्योगीक वसाहत परिसरातील कोठारी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक गोवत्स पुजन पार पडला. यावेळी गायी-वासरांचे विधीवत पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास बंसल क्लासेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी, औद्योगीक वसाहतीचे चेअरमन रतन कोठारी, वैभव धोंड, हरि मोदाणी, सुनिल फुलारी, दिनेश लोंढे, अनिल जोशी, शैलेष पांडे, सौ. वर्षा जोशी, सागर वेडेकर, अनंत कुलकर्णी, रघुवीर राडीकर आदींसह अनेकजण उपस्थित होते. परळी शहरातील औद्योगिक वसाहत, शंभू महादेव मंदिर, देशमुख यांचा वाडा, रामरक्षा गोशाळा अंबाजोगाई रोड आदी विविध भागात अतिशय उत्साहात गो पूजन करण्यात आले.


        दरम्यान, परळीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या रामरक्षा गोशाळेच्या माध्यमातून परळी शहरातील नागरिकांना गोपुजन करण्यासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने गायी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. रामरक्षा गोशाळेने गोमाता उपलब्ध करुन दिल्याने परळी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर व अतिशय उत्साहात वसुबारस साजरी करण्यात आली.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार