श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली

 श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली    



 नागापुर ते कपीलधार ४७ व्या पदयात्रेस मंगळवारी प्रारंभ                     

    पायी दिंडी मध्ये श्री गुरुराज माऊली.. मन्मथ माऊलीचा जयघोष


परळी: श्री गुरुराज माऊली.. मन्मथ माऊली ..असा जयघोष करत परळी तालुक्यातील नागापूर येथून पायी दिंडी श्रीक्षेत्र कपिलधार कडे मंगळवारी शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली निघाली

      कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त दरवर्षी नागापुर ते श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रा आयोजित करण्यात येते. यावर्षी ४७ व्या वर्षीही ही परंपरा अखंडीत राहणार असून श्री गुरू ष.ब्र.१०८ राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु ष.ब्र.१०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्राम दैवत श्री नागनाथ मंदिर नागापुर येथुन मंगळवारी निघाली.नागापूर येथे पायी दिंडी सोहळ्यानिमित्त शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्वागत माजी सरपंच प्रभू आप्पा तोंडारे  यांनी केले व  पायी दिंडी सोबत नागापूरच्या सरपंच सौ.मंगला रमेश तोंडारे  ,बसवराज आप्पा एस्के ,नागनाथ  भरडे ,आत्मलिंग फुटके, हरिहर स्वामी, वैजनाथ शेटे ,सुधाकर आप्पा तोंडारे,मनोज एस्के,भारत पांचाळ ,महादेव कोल्हे,शिवकुमार स्वामी ,मनीषा मनोज एस्के ,अपर्णा कस्तुरे, सूक्ष्म लुले, गणेश लुले ,अनिता स्वामी ,हेमा स्वामी यांच्यासह इतरभाविक  सहभागी झाले आहेत. श्रीक्षेत्र कपीलधार येथे श्री मन्मथस्वामी यात्रा महोत्सव दरवर्षी कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने आयेाजित करण्यत येतो. नागापुर ते श्री क्षेत्र कपिलधार ४७ वी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी  नागापुर येथुन पदयात्रा निघुन परचुंडी येथे दुपार व गुरुकुल खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. बुधवारी (ता.२२) दुपारचे प्रसाद भोपा येथे व मुक्काम बाबी तांडा येथे असणार आहे. गुरुवारी (ता.२३) वडवणी येथे दुपारचे प्रसाद असुन हनुमान मंदिर घाटसावळी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी दुपारचे प्रसाद शिवणी येथे असुन श्रीक्षेत्र अवधुत दत्त देवस्थान कोल्हारवाडी फाटा बीड येथे मुक्काम असणार आहे. शनिवारी (ता.२५) नागनाथ मंदिर पाली येथे दुपारचे प्रसाद असुन श्रीक्षेत्र कपिलधार येथे मुक्काम असणार आहे. रविवारी श्री क्षेत्र कपिलधार येथे गणपतअप्पा सौंदळे यांच्यावतीने नाष्टयाची सोय असणार आहे. नागापुर ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेत भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त विरशैव समाज नागापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?