वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू चव्हाण यांची नियुक्ती

 पंकजा मुंडे यांनी दिला बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला न्याय


वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू  चव्हाण यांची नियुक्ती


_पंकजाताईंचा विश्वास सार्थ करून दाखवू_


परळी वैजनाथ ।दिनांक ०९।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असतात, त्याचीच परिणीती पुन्हा आली. कौठळीच्या बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.  बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला पंकजाताईंनी न्याय दिला अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.


  वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी कौठळीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब भाऊराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे आदेश आज शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आले.  नियुक्ती नंतर चव्हाण यांनी आज यशःश्री निवासस्थानी येऊन पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली व नियुक्तीबद्दल आभार मानले. यावेळी पंकजाताईंनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


   याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, कौठळीचे साहेबराव चव्हाण, चंद्रकांत देवकते, सरपंच काटे, सुंदर वाघमोडे, सोमनवाडीचे सरपंच गोविंद सोनवणे, रवी कांदे व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पंकजाताईंनी माझ्यावर जो विश्वास टाकून जबाबदारी दिली तो विश्वास जन सामान्यांची कामे करून सार्थ करून दाखवू असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !