मार्गदर्शन शिबिर

 अवयवदान हे जीवनदान -डॉ. सुनील कुलकर्णी



नांदेड प्रतिनिधी (दिनांक १० नोव्हेंबर २०२३)

अवयवदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत दिनांक 9 नोव्हेंबर 23 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर मयूर विहार कॉलनीत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीनिवासजी इनामदार (सेवानिवृत्त मुख्य अभियंता एम एस ई बी) होते तर  प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ .सुनील कुलकर्णी (अति दक्षता विभाग प्रमुख, अश्विनी हॉस्पिटल नांदेड) व  ज्योतीताई पिंपळे ( नेत्र दान समुपदेशक गुरुगोविंद सिंग जी स्मारक रुग्णालय नांदेड) व जेष्ठ नागरिक  चक्रधरजी साले हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरेल सुरुवात सौ.  सुरेखा गाजरे यांच्या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व दिवाळी निमित्त धनाची देवता महालक्ष्मी चे  प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर मार्गदर्शन करताना  "आपल्या संस्कृतीमधे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.दानशुर कर्ण हे आदर्श उदाहरण आहे. अन्नदान, विद्यादान, रक्तदान, विधायक व सामाजिक कार्यासाठी संपत्तीचे दान हे तर महत्वाचे आहेच पण सर्वात श्रेष्ठ दान नेत्रदान, अवयवदान व देहदान आहे असे डॉ.सुनील कुलकर्णी नी आर्वजुन सांगितले.

नेत्रदान, अवयवदान, देहदान इत्यादीची तांत्रिक व कायदेशीर माहिती ज्योती पिंपळे यांनी दिली. स्वतःची व कुटुंबाची लेखी संमती असल्याशिवाय हे शक्य होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ह्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची उपस्थितांकडून ज्योतीताईंनी प्रतिज्ञा म्हणून घेतली. डॉ.  सुनील कुलकर्णीयांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मुद्देसूद व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. अवयव दान नेत्रदान तसेच देहदान याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून व्यक्ती मृत झाल्यानंतरच त्याचे अवयव काढून घेतले जातात व यामध्ये पारदर्शकता राखली जाते हे ही डॉ. कुलकर्णी स्पष्ट केले. या पवित्र कार्यात भावनात्मक न होता वस्तुनिष्ठ विचार करून आपल्या नजीकच्या व्यक्तींना स्पष्ट कल्पना देऊन या कार्यात सहभागी होऊन समाज हित व राष्ट्रहित जोपासावे असे आवाहन या दोघांनी केले. कार्यक्रमाचेचा समारोप करताना अध्यक्ष  इनामदार साहेबांनी या पवित्र कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून पुण्य कर्म करावे असे आवाहन केले.  कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व आभार श्री जयंत वाकोडकर यांनी मानले. ज्येष्ठ गायक नरेंद्र देशपांडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने दहा नागरिकांनी अवयव दानाचे संमती पत्र भरून दिले हे विशेष.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंत वाकोडकर, डॉ प्रमोद देशपांडे, प्रकाश पत्तेवार, दि. मा. देशमुख, वामनराव गाजरे, अनिल पांपटवार व कॉलनीतील नागरिकांनी परिश्रम घेतले.

तर कार्यक्रमास वसंत मैय्या, अभय शृंगारपुरे, नितीन पांपटवार, डी. डी. हामंद, व्यंकट बोरलेपवार, शाम देशमुख या मान्यवरांसह बहुसंख्येने श्रोते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !