सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार

खा.शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा-सौ.सुदामती गुट्टे


 सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार

 परळी, प्रतिनिधी...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्याकडुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण पवार यांचा रत्नदिप निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

 अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील रहिवासी परळी विधानसभा अध्यक्षपदी किरण पवार यांची नुकतीच निवड झाली असुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्या रत्नदिप या निवासस्थानी किरण पवार यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून इतोचित सत्कार जेष्ठनेते सय्यद अब्दुल समद,शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख,तालुका उपाध्यक्ष भागवत गित्ते,युवानेते सय्यद फरोज,राम जाधव, नामदेव, रामप्रसाद सोळंके,भगवान सोळंके, हनुमंत बाप्पा सोळंके, सुंदरराव सोळंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले कि,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गावागावात नव्याने सदस्य निर्माण करुन गाव तेथे शाखा करुन पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे विचार पोहचविण्यासाठी आता सज्ज होऊन साहेबांच्या पाठिशी जनतेची मोठी ताकद हुभा केली पाहिजे.केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत कुठल्याही परिस्थितीत हे दोन्हीही बिघाडी सरकारे खाली खेचण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांनी याप्रसंगी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार