पोस्ट्स

२१ वर्षीय युवकाची आत्महत्या

इमेज
२१ वर्षीय युवकाची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील बोरगाव येथे एका एककिविस वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.          याबाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. १७ मे रोजी केज तालुक्यातील बोरगाव येथे विवेक शांतीदास गालफाडे वय (२१ वर्ष) या अविवाहित युवकाने गायरानातील लिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.         हा प्रकार हा शेतातील एकाने पाहिल्या नंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस जमादार बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे हे घटना स्थळी रवाना झाले. त्यांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चिंचोली माळी येथे हलविले. रुग्णालयात प्रेताचे शविच्छेदन केल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान विवेक गालफाडे याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत

इमेज
  कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत        बीड, दि. 17 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय बीड मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुंटुबाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. बीड जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरिता एकुण 500 प्रशिक्षणार्थींचे कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून  प्राप्त झालेले आहे. बीड जिल्हातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टल वरिल नोंदणी केलेली आहे. अशा प्रशिक्षण संस्थेने 31 मे 2024 पर्यत शासनाच्या नियमानूसार सर्व आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतित प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक यांनी मान्यता दिलेली  आहे. अटी, शर्ती / निकषा नुसार प्रस्ताव सादर करावेत. तसेच खालील अटी, शर्ती / निकष लागु राहतील.            प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्

शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये

इमेज
  शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये        बीड, दि. 17 (जिमाका):सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी कापसाची लागवड ही अशा अवकाळी पावसावर करणे योग्य होणार नाही. कापसाची लागवड ही कोणत्याही परिस्थितीत 1 जून पुर्वी करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      1 जून पूर्वी लागवड केल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होत नाही व अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येणारे उत्पादन गुणवत्तेत कमी पडते तसेच पिक उत्पादनाचा खर्च अधिक येतो. अशा मालाला दरही कमी मिळतो त्यामुळे पूर्व हंगामी लागवड किफायतशीर राहत नाही. शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये.
इमेज
कु.शुभा गिरीश कुलकर्णीचे सुयश  परळी -   सीबीएसई   10 च्या    परीक्षेत  कु.शुभा गिरीश कुलकर्णी  पुण्याच्या (गोखले नगर ) विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये   95.5% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.  विशेष बाब म्हणजे शालेय अभ्यासक्रमा सोबतच कथ्थक या नृत्य प्रकारात  आर्टिस्ट म्हणुन पुण्यात शिक्षण घेत असून याबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.         परळी येथील शिक्षिका श्रीमती. पुष्पा  कुलकर्णी, नायगावकर यांची  शुभा ही नात आहे.तिच्या यशाबद्दल परळीतील आश्विन मोगरकर, नेताजी पालकर शिवाजी पालाकुडतेवार,नितीन समशेट्टे यांनी  कौतुक केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द

इमेज
मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द   मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे एकत्र येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय नको, यासाठी नारायण गडावरील सभा रद्द करण्यात आली आहे. आता पुढील सभा कधी होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तुर्तास आठ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच  मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमु

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन

इमेज
  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर  लक्ष द्यावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन         बीड, दि.16 (जि. मा. का.) :- आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते.  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दयावा. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने  रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे. तसेच उष्माघात उपचारासाठी शासकीय रूग्णालयांत सज्जता ठेवण्याच्या सुचनाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. उष्माघात होण्याची कारणे         उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रूममध्येकामकरणे, काचकारखान्यातीलकामकरणे, जास्त तापमानाच्या खोलीतकामकरणे, घट्‌ट कपडयांचा वापर करणे, उष्णतशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे. उष्माघाताची लक्षणे शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्कहोणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे,

बीड शहर पोलिसांची कामगिरी

इमेज
  बीड शहरामध्ये 26 हजार रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि औषधे पकडली बीड शहर पोलिसांची कामगिरी बीड / प्रतिनिधी शहरामध्ये अलीकडच्या काळात औषधी गोळ्या नशेचे द्रव्य म्हणून विकल्या जात आहे. यातून तरुण पिढी आणि बरीच लहान मुले सुद्धा व्यसनाधीन होत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबद्दल पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.  पोलिसांना गुप्त बातमीदाराने बातमी दिली होती की, एक तरुण नामे शेख नासीर शेख बशीर, (ह. मु. कांकलेश्वर मंदिर जवळ) हा जुना बाजार भागामध्ये गुपचूपपणे नशेच्या गोळ्या आणि औषधी विकत आहे. आणि तो नॅशनल उर्दू स्कूल समोर आता मुद्देमाल घेऊन थांबलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना पाहून मुद्देमाल जागेवरच सोडून पळून गेला. मुद्देमालात अल्प्राझोलम नावाचे औषध असलेला आणि कोडींग फॉस्फेट नावाचे खोकल्याचे औषध असलेला औषधी साठा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. हा साठा एवढा मोठा होता की, ज्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त गोळ्या आणि शंभर पेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या. त्याची किंमत 26 हजार रुपये च्या पुढे जाते. याकामी छापा टाकण्य

पाच लाखाची लाच स्वीकारली !

इमेज
  पाच लाखाची लाच स्वीकारली ! पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा ! बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच  मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.       बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या जिजाऊ मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी 30 लाख रुपयांची लाच मागितली या प्रकरणातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता बीड शहरातील प्रवीण जैन यांच्या मौजकर टेक्स्टाईल या दुकानात स्वीकारताना कुशल प्रवीण जैन याला जालना आणि बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणात चौकशी केली असता कुशल जैन याने आपण ही रक्कम पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली असल्याचे कबूल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.         बीड शहरात गेल्या काही दिवसात

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

इमेज
  बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान ? (संपुर्ण आकडेवारी) परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       बीड लोकसभा मतदारसंघातील  प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली.यावेळी मतदान टक्केवारी बर्‍यापैकी वाढलेली दिसुन येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले. जिल्हा वास यांनी यंदा कधी नव्हे ते भरभरून मतदान करत तब्बल 71 टक्के चा टप्पा गाठला. सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यात तर सर्वात कमी मतदान बीड मतदार संघात झाले आहे.      परळी वैजनाथ मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले. परळी मतदार संघात 71.31 टक्के मतदान झाले.एकंदरीत मतदार संघात एकुण मतदान केंद्रावरील मतदान किती झाले याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात  कोणत्या गावात किती मतदान झाले याची प्रत्येक मतदान केंद्रनिहाय (बुधवारईज) आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. ● टिप : एमबी न्युज च्या  माहितीसाठी ही  केवळ संकलित आकडेवारी देत आहोत.त्यामुळे ही माहिती तंतोतंत आहे असा आमचा दावा नाही.निवडणुक विभागाकडून मतदानाची आकडेवारी अधिकृत समजावी ही विनंती.

जिल्हाभरातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट

इमेज
  मतदानाच्या दुसर्‍याच दिवसापासून पंकजाताई मुंडे लागल्या कामाला ; जिल्हाभरातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट अपघातात जीव गमावलेल्या थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन परिवाराचे केले सांत्वन परळी वैजनाथ । दिनांक १४। ------ लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार  पंकजाताई मुंडे आज सकाळपासून लगेचच  कामाला लागल्या. आज दिवसभर त्यांनी परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानीं त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीसाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या बाजूने असून तुमच्या आशिर्वादानेच विकासासाठी काम करत राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी त्यांनी मतदानाच्या दिवशी अपघातात जीव गमावलेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.  जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी मतदानाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे पार पडल

विद्यार्थ्यांचे यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

इमेज
 कु.महिका गुरूप्रसाद देशपांडे सीबीएसई दहावी परीक्षेत परळी तालुक्यात प्रथम  परळी / प्रतिनिधी          परळी येथील राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या 2023-2024 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कौतुकास्पद, मराठी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली आहे.नुकत्याच मार्च- एप्रिल 2023-2024 दरम्यान सीबीएसई कडून दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.     यापैकी कु. महिका डॉ. गुरुप्रसाद देशपांडे या विद्यार्थीनींनी 97.6 टक्केगुण घेऊन परळीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. शर्वरीशिवाजी पवार हिने 94.8 टक्के,  चि.ओम अनिल घुगे यांने 94.8 टक्के, गुणघेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. खुशी संतोष नावंदर हिने94.6 टक्के, कु. रिधिमा राहुल पाठक हिने 94.6 टक्के गुण घेऊन याविद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.या निकालाचे विशेष बाब म्हणजे21 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.दहावी

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !

इमेज
  कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला ! बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील पिंपरगव्हाण भागात राहणारे अशोक राऊतमारे यांच्या घरावर काही जणांनी हल्ला केला. तू ब्राम्हण आहेस म्हणून तू कमळाला मतदान केले,कमळाला मतदान का केले म्हणून अनिल पांडुरंग पाटील,दादा सोनवणे,दादा यादव आणि अन्य दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली.घरावर तुफान दगडफेक करत सामानाची नासधूस केली.या गंभीर प्रकरणानंतर संबंधित आरोपीवर कलाम 307 सह अन्य कलमा नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

पं.गणेश्वर द्रविड शास्त्रींची उपस्थिती: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीतून दाखल केली उमेदवारी

इमेज
पं.गणेश्वर द्रविड शास्त्रींची उपस्थिती: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीतून दाखल केली उमेदवारी पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला आहे. पंतप्रधान तिसऱ्यांदा वाराणसीमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अमित शहा, राजनाथ सिंह, चिराग पासवान, रामदास आठवले, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. या जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर पंतप्रधान कालभैरवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यानंतर वाराणसी जिल्हा निवडणूक अधिकारी/ जिल्हा दंडाधिकारी एस. पीएम मोदींनी राजलिंगम यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरला. यंदा पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा या ठिकाणावरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल करताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या नामांकनात सहभागी होण्यासाठी काशीमध्ये दिग्गजांचा मेळावा भरला आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, क

बीड लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदान

इमेज
  बीड लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते  सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदान बीड, दि. 13 :(जिमाका ) बीड लोकसभा मतदार  मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता  मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.  बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते.   यामध्ये 288-गेवराई 2, 239-माजलगाव -2, 230- बीड -2 231-आष्टी -5, 232-केज -4 व 233 परळी -1 हे होते. दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी  सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते, 55 महिला मतदान केंद्र, 316 परदानशी केंद्र होती. 0000

आकडेवारी: मतदान टक्का :

इमेज
  लोकसभा निवडणुक: ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान तर बीड लोकसभेत ४६.४९ टक्के मतदान  मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार -  ४९.९१ टक्के जळगाव -   ४२.१५ टक्के रावेर -  ४५.२६ टक्के जालना - ४७.५१  टक्के औरंगाबाद  - ४३.७६  टक्के मावळ - ३६.५४ टक्के पुणे - ३५.६१ टक्के शिरूर -   ३६.४३ टक्के अहमदनगर-  ४१.३५ टक्के शिर्डी - ४४.८७ टक्के बीड -  ४६.४९ टक्के

निकाल जाहीर:यशस्वितांचे अभिनंदन

इमेज
  सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर मुंबई  :  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड  म्हणजेच सीबीएसई बोर्डाने   बारावीचा निकाल  जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, 13 मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 12वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. किती विद्यार्थी पास झाले? सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर आहे. CBSE इयत्ता 12वी परीक्षेसाठी या वर्षी 2024 मध्ये 16,33,730 विद्यार्थ्यां नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लिंगनिहाय निकाल सीबीएसई बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण

अतिशय दुःखद:भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
बीडच्या  निवडणूकीचे वार्तांकनावेळी हार्ट अटॅक, पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू बीड : बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले 'आज तक' वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.      बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते. अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.        सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.

दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान

इमेज
दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान  मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार - ३७.३३ टक्के जळगाव-  ३१.७० टक्के रावेर - ३२.०२ टक्के जालना - ३४.४२ टक्के औरंगाबाद  -  ३२.३७ टक्के मावळ -२७.१४ टक्के पुणे - २६.४८ टक्के शिरूर-   २६.६२ टक्के अहमदनगर- २९.४५ टक्के शिर्डी -३०.४९  टक्के बीड - ३३.६५ टक्के ***

प्रशासन तयार, आता मतदारांचा प्रतिसाद अपेक्षित

इमेज
  प्रशासन तयार, आता मतदारांचा प्रतिसाद अपेक्षित     बीड, दि. 12 (जिमाका ):- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपुर्ण तयारी झालेली असून आता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून प्रतिसाद द्यावा.            बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. आज सर्व विधानसभा मतदार संघतील  एकुण 2355 मतदान केंद्रावरील मतदान अध्यक्ष व त्यांची टीम त्यांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली.  2355 केंद्रांवर 10,432 अधिकारी कर्मचारी आपले मतदानाचे काम उद्या पार पाडतील . यामध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र , 55 महिला मतदान केंद्र, 22 युवा मतदान केंद्र चालक आहेत. याशिवाय 1 पोलिस तथा 1 होमगार्ड  कर्मचारी असणार आहे. बीड विधानसभा मतदार संघात असणाऱ्या मतदान केद्रांच्या केंद्रांध्यक्षांना व चमुला जिल्हा निवडणुक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.                     जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यां

अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?

इमेज
  ● अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?        मी कोणताही राजकीय व्यक्ती नाही, त्यातीलत मला काही समजत पण नाही, किवा समजावे अशी ईच्छा सुध्दा नाही, तसेच मी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभार्थी नाही, मग हा लेखन प्रपंच कशामुळे? वेळचं आली आहे!            मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहे. आज सकाळी एक उच्चभ्रू कुटुंबातील आजी त्यांच्या नातवाला माझ्याकडे लसीकरणासाठी घेऊन आल्या होत्या. अमुक अमुक ठिकाणी चांगला 3500 रुपयांना दिला आज तोच डोस तुमच्याकडे घेण्यासाठी आले आहे. मी ते डोसचे सजवलेले कार्ड पाहिले व अजींना समजावून सांगितले हे सर्व डोस आणि यात अजून एक इंजेक्शन  पोलिओचा डोस आपल्या जवळील ग्रामीण रुग्णालयामध्ये अगदी मोफत मिळतो. आजींनी जरा आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. आणि म्हणाल्या सर 12 वर्षांपूर्वी याचाच मोठ्या भावाला डोस देताना आपण म्हणाला होतात की यातील हे हे डोस सरकारी रुग्णालयात मिळणार नाही. ते आपल्याला इथेच घ्यावे लागतील. मग आता असे का म्हणतात. मी म्हणालो आजीबाई यालाच विकास म्हणतात.            साधारण 2013 बजेट मध्ये 24,239 कोटी रुपये हेल्थकेअरसाठी ठेवले होते. तेच

आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा

इमेज
  कर्तृत्वान लेकीच्या विक्रमी विजयावर परळीतील अभुतपूर्व  सभेने केलं शिक्कामोर्तब!  माझ्यावर वैद्यनाथाची सावली म्हणून उभे राहून तुम्हीच आशीर्वाद द्या ! तुमचं प्रेम आहेच- लोकसभेला संधी द्या: जीवाचे रान करुन विकासरुपाने परतफेड करेन - पंकजाताई मुंडे जिल्ह्यातील विकासाचं जे केलय ते आम्हीच केलं आणि जे नाही झालं ते आम्हीच करणार आहोत! आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा परळी वैजनाथ,।दिनांक ११। बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन आपले नेतृत्व करण्याची संधी मला आपण सर्वांनी द्यावी. यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना जिल्ह्यातील गाव,वाडी, वस्ती तांड्यापर्यंत विकासाची गंगा आपल्याला आणता आली. तुमचे आशीर्वाद माझे नेतृत्व घडवत आहे. मी विकास केला आहे हे जनता मान्य करते. ही निवडणूक विकासासाठी आहे, राज्याला आणि जिल्ह्याला एकच सरकार हवे आहे.. देशासाठी काम करायची संधी आहे.माझ्यावर तुमचं प्रेम आहेच. यावेळी लोकसभेला संधी द्या.जीवाचे रान करुन विकासरुपाने त्या प्रेमाची नक्कीच परतफेड करेन असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी दिला.  

आपघात: निष्काळजी:मरणास कारणीभुत:गुन्हा दाखल

इमेज
  स्कार्पीओने धडक दिली : एकाचा मृत्यू एक जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पीओ गाडीच्या चालकाने  वाहन निष्काळजीने चालवून मोटारसायकलस्वारांना उडवले व निघून गेला.मात्र या आपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला.या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.२७/०४/२०२४ रोजी ०१:०० वा. सुमारास परळी जे सोनपठे जाणारे रोडवर इंजेगाव शिवारात सबस्टेशन जवळ पांढऱ्या रंगाच्या एका स्कापीओ गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात हयगईने निष्काळजीपणे चालवुन मो.सा.क्र.MH-२६/AV-४८०२ हीस पाठीमागुन जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचे १०,०००/-रुपयाचे नुकसान केले.तसेच फिर्यादी अनिकेत वैजनाथ जळकुटे वय १९ वर्ष व्यवसाय मजुरी रा.तत्तापुर ता. रेणापुर जिल्हा लातुर   व सोमनाथ दिलीप ब्याळे यांना गंभिर जखमी करुन सोमनाथ दिलीप ब्याळे यांचे वय २६ वर्ष रा. आडगाव जिल्हा परभणी मरणास कारणीभुत झाला. याप्रकरणी आरोपी  पांढऱ्या रंगाचे स्कार्पीओ गाडीचा चालक नाव गाव माहित नाही

परळीत मुस्लिम समाजबांधवांसमवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
  मुंडे कुटुंबीय कधीच जात, धर्म पाहत नाहीत - धनंजय मुंडे परळीत मुस्लिम समाज बांधवां समवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका प्रत्येक बूथवरून मला जसे मताधिक्य दिले, त्यापेक्षा किमान 10 तरी मते ताईंना जास्त द्या - धनंजय मुंडेंचे आवाहन परळी शहरातील मालिकपुरा, इस्लामपुरा बंगला, पेठ मोहल्ला, कुरेशी नगर, जुने रेल्वे स्टेशन परिसर, आझादनगर आदी भागात बैठकांचे सत्र परळी वैद्यनाथ (दि. 09) - परळी वैद्यनाथ शहरात कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुस्लिम समाज बांधवांसमवेत मॅरेथॉन बैठकांचे सत्र राबवत शेकडो मुस्लिम बांधवांशी भेटून संवाद साधला.  भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून काही मुस्लिम समाज बांधवांच्या मनात शंका कुशंका पसरवल्या जात आहेत, मात्र परळीतील जनतेची सेवा करताना स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा, मी स्वतः किंवा पंकजाताई यांपैकी कोणीही कधीही जात धर्माचे राजकारण केले नाही, किंवा भविष्यातही करणार नाहीत याची खात्री सर्व परळीकरांना आहे. कोविड चे संकट असो किंवा विकासाचे कोणतेही काम असो मदत किंवा विकास करताना कधीही मध्ये जात धर्म आम्ही आणत नाही त्यामुळेच परळ