शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये
शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये
बीड, दि. 17 (जिमाका):सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी कापसाची लागवड ही अशा अवकाळी पावसावर करणे योग्य होणार नाही. कापसाची लागवड ही कोणत्याही परिस्थितीत 1 जून पुर्वी करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
1 जून पूर्वी लागवड केल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होत नाही व अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येणारे उत्पादन गुणवत्तेत कमी पडते तसेच पिक उत्पादनाचा खर्च अधिक येतो. अशा मालाला दरही कमी मिळतो त्यामुळे पूर्व हंगामी लागवड किफायतशीर राहत नाही. शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा