पाच लाखाची लाच स्वीकारली !
पाच लाखाची लाच स्वीकारली !
बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या जिजाऊ मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी 30 लाख रुपयांची लाच मागितली या प्रकरणातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता बीड शहरातील प्रवीण जैन यांच्या मौजकर टेक्स्टाईल या दुकानात स्वीकारताना कुशल प्रवीण जैन याला जालना आणि बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणात चौकशी केली असता कुशल जैन याने आपण ही रक्कम पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली असल्याचे कबूल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड शहरात गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार झाला आहे त्या प्रकरणाचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची तपासाची पद्धत वादग्रस्त ठरलेली आहे.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा