इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

निकाल जाहीर:यशस्वितांचे अभिनंदन

 सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर


मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने  बारावीचा निकाल  जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, 13 मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 12वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.


किती विद्यार्थी पास झाले?


सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर आहे. CBSE इयत्ता 12वी परीक्षेसाठी या वर्षी 2024 मध्ये 16,33,730 विद्यार्थ्यां नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लिंगनिहाय निकाल


सीबीएसई बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण 90.68 टक्के होते, यावर्षी तुलनेने या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा बारावी सीबीएसई उत्तीर्ण होण्याचे मुलींच प्रमाण 91.52 टक्के आहे. या वर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 84.67 टक्के होतं. मुलांपेक्षा 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी एकंदरच चांगली कामगिरी केली आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 50 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 60 टक्के होतं.

एक लाख विद्यार्थ्यांचे गुण 90 टक्क्यांहून अधिक


सीबीएसई बोर्डाच्या निकालात या वर्षी 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 1.16 लाखांपेक्षा जास्त 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा उत्तीर्ण परीक्षार्थी होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. गेल्या वर्षी, 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती, ज्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 87.33 टक्के होती. 2022 मध्ये, एकूण 1,435,366 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.7 टक्के होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या