परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन

 उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर  लक्ष द्यावे


निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन


        बीड, दि.16 (जि. मा. का.) :- आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते.  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दयावा. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने  रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे. तसेच उष्माघात उपचारासाठी शासकीय रूग्णालयांत सज्जता ठेवण्याच्या सुचनाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

उष्माघात होण्याची कारणे

        उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रूममध्येकामकरणे, काचकारखान्यातीलकामकरणे, जास्त तापमानाच्या खोलीतकामकरणे, घट्‌ट कपडयांचा वापर करणे, उष्णतशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे.

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्कहोणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था उलटी इत्यादी, होणे.

जोखीमेचा गट

   वय -5 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त,  कष्टाची सवय नसणारे लोक,  धुम्रपान, मदयपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती, मुत्रपिंड, हद्‌रोग, यकृत, त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण, Diuretics, anti allergic, tranqilizers, stimulants etc.या औषधींचे सेवन सुरू असलेले रुग्ण, जास्त तापमान, अति आर्द्रता, वातुनूकलनाचा अभाव, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातीलकाम ऊन आणि उष्णतेशी संबधीत व्यवसाय करणा-या व्यक्ती.


प्रतिबंधात्मक उपाय


            वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाचीकामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत. सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे. आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावी. वृध्दांना व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.


उपचार


  रुग्णास हवेशीर खालीत ठेवणे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. शक्यतो वातानुकुलीत खोलीत ठेवावेत., रुग्णाच्या शरिराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रोग्याला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी,रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवावे. आईसपॅक लावावेत, ओआरएससोल्युशन दयावे.


उन्हाळयामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजनाकरणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी,कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यकती सर्व तयारी ठेवणेबाबत कळविण्यात आलेले आहे. (उदा.हवेशीर खोली, पुरेसा औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर इ. सुस्थितीत ठेवावी) यांचीसोय करावी.


बर्फाच्या उपलब्धतेसाठी फ्रिज सुस्थितीत असणे आवश्यक आहे. उष्माघाताची कारणे लक्षणे प्राथमिक उपचार त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याची माहिती आरोग्य शिक्षणाद्वारे प्रचार माध्यमातून दयावी.


काय करावे काय टाळावे :-

     काय करावे -तहान नसलीतरी भरपूर पाणी / सरबत प्यावे, हवा खेळती राहण्याकरीता पंख्याचा वापर करावा.

सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावे. सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा चष्मा वापरणे, मजुर वर्गास वारंवार विश्रांती घेवु दयावी, उन्हातुन आल्यावर चेह-यावर आलेकापड ठेवावे.


काय टाळावे

मद्य,सोडा, कॉफी, अतीगार पाणी इ. पिणे, गरज नसतांना उन्हात बाहेर फिरणे, तंग, व गडदकपडे वापरणे, सवय आहे म्हणून उन्हात निघणे, अति व्यायाम करणे, बंद कार मध्ये राहणे, अति शारिरिककष्टाचेकामेकरणे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12.00 ते 3.30 याकालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेचमोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!