परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द
मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा