अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?
● अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?
मी कोणताही राजकीय व्यक्ती नाही, त्यातीलत मला काही समजत पण नाही, किवा समजावे अशी ईच्छा सुध्दा नाही, तसेच मी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभार्थी नाही, मग हा लेखन प्रपंच कशामुळे? वेळचं आली आहे!
मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहे. आज सकाळी एक उच्चभ्रू कुटुंबातील आजी त्यांच्या नातवाला माझ्याकडे लसीकरणासाठी घेऊन आल्या होत्या. अमुक अमुक ठिकाणी चांगला 3500 रुपयांना दिला आज तोच डोस तुमच्याकडे घेण्यासाठी आले आहे. मी ते डोसचे सजवलेले कार्ड पाहिले व अजींना समजावून सांगितले हे सर्व डोस आणि यात अजून एक इंजेक्शन पोलिओचा डोस आपल्या जवळील ग्रामीण रुग्णालयामध्ये अगदी मोफत मिळतो. आजींनी जरा आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. आणि म्हणाल्या सर 12 वर्षांपूर्वी याचाच मोठ्या भावाला डोस देताना आपण म्हणाला होतात की यातील हे हे डोस सरकारी रुग्णालयात मिळणार नाही. ते आपल्याला इथेच घ्यावे लागतील. मग आता असे का म्हणतात. मी म्हणालो आजीबाई यालाच विकास म्हणतात.
साधारण 2013 बजेट मध्ये 24,239 कोटी रुपये हेल्थकेअरसाठी ठेवले होते. तेच 2024 मध्ये 98,462 कोटी आहेत. विचार करा, साधारण चार पटिने हेल्थ बजेट वाढवले आहे. म्हणजे प्राथमिकता कशाला दिली पाहिजे ह्यासाठी सुद्धा समजदार नेतृत्व लागते. नुसतेच देशभर पायी फिरून, गरिबीचे चटके आणि परिस्थितीचे फटके खाल्ल्याशिवाय ते समजत नसते. प्रधानमंत्री आयुष्य योजना ही health for all by 2030 ह्या WHO च्या ब्रीदवाक्याच्या संकल्पाचा एक हिस्सा आहे. Universal health coverage plan ह्याचे उद्दिष्ट 2030 मध्ये गाठण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ह्यात rs-5,00,000 प्रत्येक गरीब कुटुंबासाठी गंभीर आरोग्यविषयक समस्यांसाठी राखीव ठेवले जातात व तात्काळ मदत मिळते. हे अजून तिसऱ्या जगातील बर्याच इतरम देशांना स्वप्नसुद्धा पडू शकत नाही. ते आपण मागील दहा वर्षांमध्ये साध्य केले आहे. यामध्ये 40 कोटी जनता समाविष्ट केली आहे. एवढा व्यापक विचार मागील 70 वर्षात कोणी केला होता का?
आज खेडोपाडी वाड्यावर, रस्त्यांवर सुद्धा रात्री अपरात्री 108 ॲम्बुलन्स एका फोनवर उपलब्ध होते. पूर्वी गावांमध्ये आठवड्यातून बाजारचा दिवस सोडला तर डॉक्टर सुद्धा येत नसे. प्रत्येक गावांना जोडणाऱ्या गुळगुळीत खड्डे मुक्त रस्त्यावरून आडलेली अवघडलेली वेदनेने तळमळणारी गरोदर स्त्री तसेच सहा महिन्यांखालील शिशू यांना मोफत जवळील आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जातानी पाहिली आहे ना 108 ची ॲम्बुलन्स? याला विकास नाहीतर काय म्हणणार ह्यात काय जात धर्म पंथ विचारलं जात का?
माता आणि बाळ संगोपन क्षेत्रामध्ये नेत्र दीपक कामगिरी या सरकारने केली आहे आकडेच सांगतात मोदी कसे?
2014 ते 2024
माता मृत्यूदर.167लाख.....99लाख
नवजातशिशु मृत्यूदर 39/1000......21/1000
पाच वर्षाखालील बालमृत्यू प्रमाण 45/1000......32/1000
तुम्ही सरकारी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला आता केस पेपर काढण्यासाठी एक पैसा सुद्धा लागत नाही. महालॅब मध्ये रक्त व इतर तपासण्या अल्प दरात होतात आणि आता तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणासारखी बहुतांश ठिकाणी सिटीस्कॅन सारखी सुविधा पूर्णत मोफत आहे.आता वैद्यकीय शिक्षणाविषयी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही अत्यंत भ्रष्ट प्रशासकीय मंडळ 25 सप्टेंबर 2020 मध्ये बरखास्त करून आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली नॅशनल मेडिकल कमिशन्स सुरू केली. परिणामत: देशात 2014 असणारे 387 मेडिकल कॉलेजेस वाढवून 2024 मध्ये 706 पर्यंत आकडा पोहोचला. mbbs च्या 51,348 जागेपासून आजच्या 105,163 पर्यंत झेप मारता आली व वैद्यकीय उच्च शिक्षणाच्या 31,185 पासून 66,818 जागा 2023 पर्यंत वाढवण्यात आल्या. AIIMS चे दर्जेदार 22 नवे वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशलिटी सेंटर पण याच दहा वर्षात झाले बर का!
157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेजेस पण याच दहा वर्षात झाले! फिर भी पुछते हो मोदी क्यू?
मुलींसाठी RUBELLA VACCINE असेल गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर साठी ची लस ( जिची बाजारातील किंमत साधारण 3000 रुपये आहे ) ती पण सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत मिळत आहे! का बरं लसीकरणांबद्दल व्यापक विचार आधी होऊ शकला नाही असे!
आता घरातून रुग्णालयात तुम्ही फक्त एका फोन कॉल च्या किमतीमध्ये पोहोचतात, तपासण्या, उपचार, प्रतिबंधक लसी सर्व काही मोफत मिळाल्यावर डॉक्टरांचे prescription घेऊन औषधलयात आल्यावर जनऔषधी केले आहेच!औषध निर्माण क्षेत्रामध्ये ह्या 10 वर्षांमध्ये अमूलग्र क्रांती झाली आहे. औषध निर्मितीच्या परवान्याच्या ज्याचं अशी कमी केल्यामुळे ह्या क्षेत्रात 15 पटींनी वाढ झाली आहे जन औषधी योजनेमध्ये ब्रँडेड पेक्षा 50 ते 90 % स्वस्त औषधी मिळतात यामध्ये 1965 औषधांचा समावेश असून 293 सर्जिकल आहेत. आज देशभरात 25 हजार पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र कार्यरत आहेत.
कुठे घेऊन बसलात जात,धर्म, पंथ,वार्ड,तालुका अंतर्मुख व्हा, विचार करा,मी माझे सहकारी आप्त स्वकीय, नातेवाईक, कोणी ना कोणी ह्या योजनेचा लाभार्थी आहे. कित्येकांचे प्राण वाचले आहेत. म्हणून मतदान करा, नागरिक म्हणून आपले कर्तव्य व हक्क पण आहे .
मग हक्काचे मत कोणाला --कमळाला.
पंकजाताईंना म्हणजेच नरेंद्रभाईंना.
टीप : अशी प्रगती इतरही क्षेत्रात असेल माहित नाही.
✍️ डॉ. गुरुप्रसाद ज. देशपांडे
एक सामान्य नागरीक,भारत राष्ट्र!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा