२१ वर्षीय युवकाची आत्महत्या
२१ वर्षीय युवकाची आत्महत्या
केज :- केज तालुक्यातील बोरगाव येथे एका एककिविस वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. १७ मे रोजी केज तालुक्यातील बोरगाव येथे विवेक शांतीदास गालफाडे वय (२१ वर्ष) या अविवाहित युवकाने गायरानातील लिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.
हा प्रकार हा शेतातील एकाने पाहिल्या नंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस जमादार बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे हे घटना स्थळी रवाना झाले. त्यांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चिंचोली माळी येथे हलविले. रुग्णालयात प्रेताचे शविच्छेदन केल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान विवेक गालफाडे याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा