परळीत मुस्लिम समाजबांधवांसमवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका

 मुंडे कुटुंबीय कधीच जात, धर्म पाहत नाहीत - धनंजय मुंडे


परळीत मुस्लिम समाज बांधवां समवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका


प्रत्येक बूथवरून मला जसे मताधिक्य दिले, त्यापेक्षा किमान 10 तरी मते ताईंना जास्त द्या - धनंजय मुंडेंचे आवाहन


परळी शहरातील मालिकपुरा, इस्लामपुरा बंगला, पेठ मोहल्ला, कुरेशी नगर, जुने रेल्वे स्टेशन परिसर, आझादनगर आदी भागात बैठकांचे सत्र


परळी वैद्यनाथ (दि. 09) - परळी वैद्यनाथ शहरात कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुस्लिम समाज बांधवांसमवेत मॅरेथॉन बैठकांचे सत्र राबवत शेकडो मुस्लिम बांधवांशी भेटून संवाद साधला. 


भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून काही मुस्लिम समाज बांधवांच्या मनात शंका कुशंका पसरवल्या जात आहेत, मात्र परळीतील जनतेची सेवा करताना स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा, मी स्वतः किंवा पंकजाताई यांपैकी कोणीही कधीही जात धर्माचे राजकारण केले नाही, किंवा भविष्यातही करणार नाहीत याची खात्री सर्व परळीकरांना आहे. कोविड चे संकट असो किंवा विकासाचे कोणतेही काम असो मदत किंवा विकास करताना कधीही मध्ये जात धर्म आम्ही आणत नाही त्यामुळेच परळीतील मुस्लिम बांधवांनी प्रत्येक बूथ मधून मला लीड देत भरघोस मतांचा आशीर्वाद दिला. त्याच बळावर मी मंत्री झालो. त्यामुळे आता असाच आशीर्वाद आपल्याला आपल्या पंकजाताई साठी सुद्धा उभा करायचा आहे, असे धनंजय मुंडे या संवाद बैठकांच्या माध्यमातून म्हणाले. 


प्रत्येक बूथ मधून विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी जी 'मोहब्बत' मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन व अधिकचे मताधिक्य देऊन माझ्याप्रति व्यक्त केली, आता त्याहीपेक्षा जास्त, प्रत्येक बूथ वरून कमीत कमी दहा मते माझ्यापेक्षा जास्त पंकजाताईला मिळावेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी या संवाद बैठकीदरम्यान गेले. 


या संवाद दौऱ्यात धनंजय मुंडे यांनी नगरसेवक तथा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाजेर हुसेन यांच्या समन्वयातून मालिकपुरा येथे, माजी नगराध्यक्ष जाबेर खान यांच्या समन्वयातून इस्लामपुरा बंगला, नगरसेवक अन्वर मिस्किन यांच्या समन्वयातून पेठ मोहल्ला येथे, माजी उपनगराध्यक्ष शकील भाई कुरेशी यांच्या समन्वयातून कुरेशी नगर येथे नगरसेवक अजीज कच्छी यांच्या समन्वयातून जुने रेल्वे स्टेशन परिसरात तसेच नगरसेवक राजाखान पठाण यांच्या समन्वयातून आझादनगर येथे संवाद बैठका संपन्न झाल्या. यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांसह स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !