इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

बीड शहर पोलिसांची कामगिरी

 बीड शहरामध्ये 26 हजार रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि औषधे पकडली


बीड शहर पोलिसांची कामगिरी

बीड / प्रतिनिधी

शहरामध्ये अलीकडच्या काळात औषधी गोळ्या नशेचे द्रव्य म्हणून विकल्या जात आहे. यातून तरुण पिढी आणि बरीच लहान मुले सुद्धा व्यसनाधीन होत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबद्दल पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

पोलिसांना गुप्त बातमीदाराने बातमी दिली होती की, एक तरुण नामे शेख नासीर शेख बशीर, (ह. मु. कांकलेश्वर मंदिर जवळ) हा जुना बाजार भागामध्ये गुपचूपपणे नशेच्या गोळ्या आणि औषधी विकत आहे. आणि तो नॅशनल उर्दू स्कूल समोर आता मुद्देमाल घेऊन थांबलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना पाहून मुद्देमाल जागेवरच सोडून पळून गेला. मुद्देमालात अल्प्राझोलम नावाचे औषध असलेला आणि कोडींग फॉस्फेट नावाचे खोकल्याचे औषध असलेला औषधी साठा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. हा साठा एवढा मोठा होता की, ज्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त गोळ्या आणि शंभर पेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या. त्याची किंमत 26 हजार रुपये च्या पुढे जाते. याकामी छापा टाकण्यासाठी औषध निरिक्षक जीवन दत्तात्रय जाधव, बीड यांची मदत घेण्यात आली. आणि त्यांच्या तक्रारीवरून यामध्ये एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

यामध्ये सर्व औषधी कुठून आणली याचा शोध घेण्यात येणार आहे आणि ज्यांनी ही औषधी पुरवली त्यांनाही प्रमुख आरोपी करण्यात येणार आहे. यामध्ये यास मदत करणारे सर्वांना आरोपी करण्यात येणार आहे. 

अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे नशेच्या गोळ्या आणि द्रव्य कोणी विकत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. 

सदरील कारवाई नंदकुमार ठाकूर,पोलीस अधीक्षक, बीड,  सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक, बीड, विश्वंभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड,  यांच्या मार्गदर्शनाखाली शीतलकुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक बीड,  शहर तसेच पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाट,  मनोज परजणे, अशपाक सय्यद, शहेनशहा सय्यद,  अयोध्या डोके, सुषेण पवार यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या