इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

विद्यार्थ्यांचे यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

 कु.महिका गुरूप्रसाद देशपांडे सीबीएसई दहावी परीक्षेत परळी तालुक्यात प्रथम

 परळी / प्रतिनिधी

         परळी येथील राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या 2023-2024 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कौतुकास्पद, मराठी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली आहे.नुकत्याच मार्च- एप्रिल 2023-2024 दरम्यान सीबीएसई कडून दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

    यापैकी कु. महिका डॉ. गुरुप्रसाद देशपांडे या विद्यार्थीनींनी 97.6 टक्केगुण घेऊन परळीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. शर्वरीशिवाजी पवार हिने 94.8 टक्के,  चि.ओम अनिल घुगे यांने 94.8 टक्के, गुणघेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. खुशी संतोष नावंदर हिने94.6 टक्के, कु. रिधिमा राहुल पाठक हिने 94.6 टक्के गुण घेऊन याविद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.या निकालाचे विशेष बाब म्हणजे21 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत पोदार लर्न स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

यामध्ये मानसी तिवारी, नवनाथ गव्हाणे, रचना खंदारे, सपना लाहोरकर,श्रावणी अय्या, स्नेहल कदम ,शर्वरी पवार आणि तन्मय अहिरे यांचा समावेश आहे.तसेच 90 ते 100 या दरम्यान मराठी विषयात 54 विद्यार्थ्यांनी गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविले. या विशेष कामगिरीबद्दल मराठी विभाग प्रमुख दिनेश जयतपाळ यांचा शाळेच्या वतीने अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा

यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे.या घवघवीत यश मिळविल्यामुळे  शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य लक्ष्मण पाटील, परीक्षा विभागप्रमुख ज्ञानेश्वर गुठ्ठे  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतरकर्मचारी तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या