इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आपघात: निष्काळजी:मरणास कारणीभुत:गुन्हा दाखल

 स्कार्पीओने धडक दिली : एकाचा मृत्यू एक जखमी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पीओ गाडीच्या चालकाने  वाहन निष्काळजीने चालवून मोटारसायकलस्वारांना उडवले व निघून गेला.मात्र या आपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला.या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.२७/०४/२०२४ रोजी ०१:०० वा. सुमारास परळी जे सोनपठे जाणारे रोडवर इंजेगाव शिवारात सबस्टेशन जवळ पांढऱ्या रंगाच्या एका स्कापीओ गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात हयगईने निष्काळजीपणे चालवुन मो.सा.क्र.MH-२६/AV-४८०२ हीस पाठीमागुन जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचे १०,०००/-रुपयाचे नुकसान केले.तसेच फिर्यादी अनिकेत वैजनाथ जळकुटे वय १९ वर्ष व्यवसाय मजुरी रा.तत्तापुर ता. रेणापुर जिल्हा लातुर  व सोमनाथ दिलीप ब्याळे यांना गंभिर जखमी करुन सोमनाथ दिलीप ब्याळे यांचे वय २६ वर्ष रा. आडगाव जिल्हा परभणी मरणास कारणीभुत झाला. याप्रकरणी आरोपी  पांढऱ्या रंगाचे स्कार्पीओ गाडीचा चालक नाव गाव माहित नाही याच्याविरुद्ध मरणास कारणीभुत झाला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पो.हे.कॉ. ४४८ तोटेवाड  हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या