आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा

 कर्तृत्वान लेकीच्या विक्रमी विजयावर परळीतील अभुतपूर्व  सभेने केलं शिक्कामोर्तब!

 माझ्यावर वैद्यनाथाची सावली म्हणून उभे राहून तुम्हीच आशीर्वाद द्या !


तुमचं प्रेम आहेच- लोकसभेला संधी द्या: जीवाचे रान करुन विकासरुपाने परतफेड करेन - पंकजाताई मुंडे

जिल्ह्यातील विकासाचं जे केलय ते आम्हीच केलं आणि जे नाही झालं ते आम्हीच करणार आहोत!


आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा


परळी वैजनाथ,।दिनांक ११।

बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन आपले नेतृत्व करण्याची संधी मला आपण सर्वांनी द्यावी. यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना जिल्ह्यातील गाव,वाडी, वस्ती तांड्यापर्यंत विकासाची गंगा आपल्याला आणता आली. तुमचे आशीर्वाद माझे नेतृत्व घडवत आहे. मी विकास केला आहे हे जनता मान्य करते. ही निवडणूक विकासासाठी आहे, राज्याला आणि जिल्ह्याला एकच सरकार हवे आहे.. देशासाठी काम करायची संधी आहे.माझ्यावर तुमचं प्रेम आहेच. यावेळी लोकसभेला संधी द्या.जीवाचे रान करुन विकासरुपाने त्या प्रेमाची नक्कीच परतफेड करेन असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी दिला.

       बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराची समारोप सभा परळीच्या मोंढा मैदानावर झाली.या अभुतपूर्व विराट जाहीर सभेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री  संभाजी पाटील, किरण पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तमाम परळिकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, जो वंचित, उपेक्षित आहे, ज्याचा कोणी वाली नाही त्याची सेवा करण्यासाठी माझ्या पित्याने मला राजकारणात आणलं. मला पाच वर्षे मुंडे साहेबांनी मागितले होते मात्र त्यापुर्वीच त्यांचे  निधन झाले.आता तुम्हीच वैद्यनाथाची सावली म्हणून माझे आहात. तुम्हीच माझी उर्जा आहात.तुम्हीच माझी या निवडणुकीत काळजी घ्या. तुमच्या सेवेसाठी मी काम करणार आहे हा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी दिला.


जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे

---------

मला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे.  जिल्ह्यातील जमीन ओलिताखाली आणायची आहे. शेतकरी ऊस तोड कामगारांचे जोवन उंचावण्यासाठी काम करायचं आहे, मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मला हे काम आगामी पाच वर्षात करायचे आहे. जिल्ह्यातील 10  हजार तरुणांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे. जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारायचे आहे. यासाठी ही निवडणूक असुन प्रचंड मताधिक्याची मला अपेक्षा आहे असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.


आजचा मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा

-------

     आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा आहे.पहिल्यांदा जेंव्हा मी निवडणूक लढली त्यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडितअण्णा मुंडे ,धनंजय मुंडे असा संपूर्ण परिवार या मंचावर होता.त्यानंतर जे घडले ते माझ्यासाठी अस्वस्थ करणारे होते.मी निवडणूक जिंकले,मंत्री झाले, अनेक कामे केली,राजकीय वाटचाल सुरु राहिली.धनंजय मुंडेही विरोधीपक्षनेते झाले,मंत्री झाले त्यांचीही  राजकीय वाटचाल सुरु राहिली मात्र मनातील अस्वस्थता कमी झाली नाही.आज आम्ही एक आहोत.आमच्या पक्षांचीही युती झाली. त्यामुळे आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा असल्याचे पंकजाताई यांनी यावेळी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार