इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

जिल्हाभरातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट

 मतदानाच्या दुसर्‍याच दिवसापासून पंकजाताई मुंडे लागल्या कामाला ; जिल्हाभरातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट

अपघातात जीव गमावलेल्या थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन परिवाराचे केले सांत्वन


परळी वैजनाथ । दिनांक १४।

------

लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार  पंकजाताई मुंडे आज सकाळपासून लगेचच  कामाला लागल्या. आज दिवसभर त्यांनी परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानीं त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीसाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या बाजूने असून तुमच्या आशिर्वादानेच विकासासाठी काम करत राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी त्यांनी मतदानाच्या दिवशी अपघातात जीव गमावलेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


 जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी मतदानाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे पार पडल्यानंतर पंकजाताई मुंडे आज लगेचच पुन्हा कार्यकर्त्यांत मिसळल्या. सकाळपासून जिल्हाभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परळी निवासस्थानी पंकजाताईंना भेटण्यासाठी आले होते. यावेळी पंकजाताईंनी प्रत्येकाकडून मतदारसंघनिहाय आढावा घेत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. आपण सर्वांनी खूप चांगले काम केले. मतदानादिवशी प्रचंड उन्हात त्रास घेत बुथवर थांबलात, आपण घेतले’असे सांगत सर्वांचे आभार मानले.  माझा विजय निश्चित आहे. समाजातील सर्व घटकांसाठी आपण काम करत राहणार आहोत. आपली लढाई कोणत्याही जातीच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात नव्हती. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण योगदान देत राहू. बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे.जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणूकीतही तेच दिसले.जनतेचा आशीर्वाद मला   निश्चित मिळेल अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.


थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन केले परिवाराचे केले सांत्वन

------

मतदानासाठी येत असताना थेरला येथील युवक अंगद रामहरी नागरे याचे शिरूर घोडनदी जवळ रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्या व्यथित झाल्या. काल सर्वत्र मतदान सुरू असल्याने त्या जाऊ शकल्या नव्हत्या पण आज दुपारी त्यांनी थेरला येथे जाऊन नागरे परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. मतदानाच्या दिवशीच आणखी एक घटनेत येवलवाडी येथील सुनिता नागरगोजे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, त्यांच्याही घरी जाऊन पंकजाताईंनी परिवाराची भेट घेतली धीर दिला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट