पोस्ट्स

संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता

इमेज
  संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न संविधानामूळेच साकार होईल -शामसुंदर महाराज सोन्नर  संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता पंढरपूर (प्रतिनिधी) : जात-धर्म,  स्री-पुरुष हे सर्व भेद  विसरून सामाजिक ऐकायाचं  देखण रूप पंढरीची वारीमध्ये पहायला मिळतं. द्वेष, मत्सराचा लवलेशही कुठे दिसत नाही. पंढरीच्या दिंडीत दिसणारा हा एकोपा जेव्हा प्रत्येक गावात दिसेल तेंव्हा संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न साकार होईल. ते संतांनी पाहिलेले स्वप्न फक्त संविधानामूळेच सत्यात येईल, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी पंढरपूर येथे केले. संविधान समता दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. समता भूमी फूलेवाडा येथून निघालेल्या संविधान समता दिंडीचा समारोप पंढरपूर येथील घेरडीकर मठात झाला. अध्यक्षस्थानी भारत महाराज घोगरे गुरुजी होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या संविधान मूल्यांच्या पाऊल खूणा आपल्याला संत साहित्यात जागोजागी पहायला मिळतात. पंढरीच्या वारीमध्येही त्याचाच अविष्कार दिसतो. हा संतांनी पेरलेल्या समतेच्या विचारांचा विजय आहे. पंढरीच्या वारीतील
इमेज
  ' बा विठ्ठला… बळीराजाला सुखाचे दिवस येऊ देत'; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे सोलापूर : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या  भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्व
इमेज
  विद्यावर्धिनी विद्यालयाच्या बाल दिंडीने शक्तीकुंज वसाहतीत अवतरली पंढरी परळी (प्रतिनिधी)   आषाढी एकादशीचे निमित्त साधून  विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शक्तीकुंज वसाहतीत बाल दिंडी काढली होती.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत विठुनामाच्या गजरात वसाहतीतील रस्त्यावरुन पालखीसह बालदिंडीने नागरीकांचे लक्ष वेधले.     विद्यावर्धीनी विद्यालयातील या बाल दिंडीचे प्रस्थान बुधवार दि.28 जुन रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.पालखीतील विठ्ठल प्रतिमेचे पूजन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.जीईटके,बालासाहेब महाराज फड,दीनदयाल नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, पत्रकार धनंजय आढाव,धीरज जंगले,माणिक कोकाटे,प्रा.राजु कोकलगावे सर,संस्थेचे सदस्य एस. बी.भिंगोरे,एम.टी.मुंडे,व पालक श्री सुनीलजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मातेकर,सुमठाणे यांनी गुलाब पुष्प देऊन केले.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत असलेल्या या बाल वारकऱ्यांनी नवीन शक्तीकुंज वसाहतीतील भक्तिगीते व विठ्ठलाचे अभंग गाऊन वातावरण भक्तिमय

ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरहस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन

इमेज
 श्रीक्षेत्र कपिलधार येथे  ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरहस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)                 श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन सोमवार (ता.०३) गुरुपौर्णिमा ते सोमवार (ता.०७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.              स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अख
इमेज
  भिषण अपघात :चार जण जागीच ठार ! डोंगरकिन्ही –  बीड कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे जात नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये चार जण जागीच ठार झाले असून एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत • 

MB NEWS:आषाढी वारीनिमित्त लेखमाला 29 जून, आषाढी एकादशी -

इमेज
  अवघे गर्जे पंढरपूर ------------------------------- ✍️ - शामसुंदर महाराज सोन्नर  ------------------------------- टा ळोटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुरला छंद ।। असा रोमारोमातून सावळ्या विठूच्या भक्तीरसाचा कल्लोळ उचंबळून आला आहे. पताकांचे भार, मिळाले अपार, असे पंढरपूरचे दृश्य दिसत आहे. शेकडो मैलांचा प्रवास संपवून पंढरपुरात दाखल होताच अवघाचि संसार सुखाचा झाल्याचा आनंद वारकर्‍यांना झाला आहे. _________________________ चला हो पंढरी जाऊ । जिवाच्या जिवलगा पाहू ।। असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्‍यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारकर्‍यांची ही वारी सलग दुसर्‍यांदा चुकली आहे. ‘चुकलिया माय । बाळ हुरहूरा पाहे ।’ अशी वारकर्‍यांची अवस्था झाली आहे. कारण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मला विसरू नका, अशी आळवणी याच खुद्द पाडुरंगानेच केली असल्याची नोंद नामदेव महाराजांनी करून ठेवलेली आहे.
इमेज
  आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक!  उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर हा प्रकार घडला असून बाईकस्वाराची सध्या कसून चौकशी केली जात आहेत. या अपघातात बाईकस्वाराला कसलीही दुखापत झाली नसून आदित्य ठाकरे यांच्या गाडीला खरचटलं आहे.     मिळालेल्या माहितनुसार, आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन येथे येत असताना गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते. तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडक दिली. आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे आले यावेळी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

आषाढीवारी / प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लॉग: 'मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ : हभप दशरथ महाराज सिनगारे

इमेज
 'मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ : हभप दशरथ महाराज सिनगारे  महाराष्ट्रसह देशाला संतांच्या विचारांची गरज आहे. संतांनी दिलेला विचारच देशाला तारून नेईल. संत विचाराची आज खरी गरज आहे, असे "ह.भ.प. दशरथ महाराज सिनगारे" बर्दापूरकर यांचे मत आहे .महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, ,संत एकनाथ,संत तुकाराम, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार,संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आदी अनेक संत येथे होऊन गेले.आपला मराठवाडा तर अनेक साधू-संत-महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. सध्या माणसा-माणसांमधील माणुसकी संपून जात असून अशा परिस्थितीत संतांचे विचार वाचा, त्याचे अनुकरण करा, तेच देशाला सद्य परिस्थितीतून दूरवर घेऊन जातील,खरा मार्ग दाखवतील आणि महाराष्ट्राच्या पूर्वीच्या आगळ्या-वेगळ्या परंपरेला पूर्ववत आणून ठेवतील.अशी "हभप दशरथ महाराज सिनगारे बर्दापूरकर "यांची धारणा आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील" बर्दापूर "या छोट्याशा गावात तुकाराम किसन सिनगारे आणि लक्ष्मीबाई तुकाराम स
इमेज
  भेल सेकंडरी स्कूलच्या बालवाडीच्या विभागातील विद्यार्थ्यांची लक्षवेधक पालखी दिनांक 28 जुन 2023 बुधवार रोजी सर्व चिमुकले वारकरी वेशभूषात आले होते. त्यातील काही विठ्ठल ,रुक्मिणी ,वारकरी यांच्या वेशभूषेत सुंदर दिसत होते. या बाल समुदायाची दिंडी जेव्हा शाळेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर आल्यावर डॉ.श्री.सतीश रायते सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.राव सर ,सौ.शोभा भंडारी मॅडम यांनी पालखीचे स्वागत केले. राम मंदिरात पालखीची विधीवत पूजा अर्चना झाली .या बालसमुदायामुळे राम मंदिराला साक्षात पंढरीचे स्वरूप आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव किड्स विभागाच्या प्रमुख सो.सविता राऊत मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी डॉ.श्री. सतीश रायते सर,सौ.शोभा भंडारी मॅडम, मुख्याध्यापक श्री.राव सर ,पाटील सर. पितांबर सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

आजचे मंत्रिमंडळ निर्णय :संक्षिप्त

इमेज
मंत्रिमंडळ निर्णय :संक्षिप्त * वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव (सार्वजनिक बांधकाम) * एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव ( नगर विकास विभाग) * राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता ( सार्वजनिक आरोग्य विभाग ) • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ (जलसंपदा विभाग ) • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.   (सार्वजनिक आरोग्य विभाग) • संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ  (सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग) • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार  (कामगार विभाग) • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग) * मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता. ( सामान्

अभिष्टचिंतन लेख

इमेज
आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता : सय्यद सिराज        राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद सिराज म्हणजे आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता आहे. गेल्या 17 वर्षापासून तो आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याच्या एकनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्याला युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष हे मानाचे पद देण्यात आले. सय्यद सिराज याने कधीही स्वार्थ पाहून काम केले नाही. अगदी निस्वार्थीपणे आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी जेवढे जमेल तेवढे काम करतो. या पक्ष कार्यातुन आपला काही फायदा होईल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही. आपण केलेल्या कामातुन नागरिकांना आपल्या नेत्याबद्दल आदर वाटावा आणि नेत्याच्या नजरेत आपली कायम चांगली प्रतिमा रहावी एवढीच त्याची माफक अपेक्षा ! कोणताही राजकीय वारसा नसताना सय्यद सिराज यांनी परळीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कामासाठी माध्यम असावे म्हणून त्यांनी सुरूवातीला शमीम बेगम सेवाभावी संस्था स्थापन करून अनेक

तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी

इमेज
  तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        मराठा सेवा संघाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध कक्षांच्या तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असून मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे तर परळी शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.     याबाबत माहिती अशी की, शहरातील व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी मराठा सेवा संघाची नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली. मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती मल्टीस्टेट चे अध्यक्ष प्रा . गंगाधर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध  कक्षांच्या परळी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. यावेळी मराठा सेव

MB NEWS:म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार

इमेज
म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा  सत्कार परळी (प्रतिनिधी)दि.27 - श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली.याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.प्रा.देशमुख यांनी 17 जून रोजी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली.त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्रा.बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने निवासस्थानी नवनियुक्त सचिवांचा शाल पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील,उपाध्यक्ष श्रीराम लांडगे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी ढगे,ज्येष्ठ पत्रकार तथा सदस्य धनंजय आढाव,रवींद्र जोशी, महादेव शिंदे,संभाजी मुंडे,संजीब रॉय, प्रा.प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. व्हॉईस ऑफ मिडियाकडून देशमुख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
इमेज
  केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सैन्य दलातील जवान उमेश मिसाळ शहीद २८ जून रोजी कोल्हेवाडीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार  केज :- केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत.          केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. त्यांचे दि. २६ जून रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षां पूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. केवळ सहा महिन्या पूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश चे पार्थिव घेऊन आज दि. २७ जून रोजी रात्री ११:०० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्या नंतर ते २८ जून रोजी सकाळी ८:०० वा. पर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचेल. त्या नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांचा अंत्यविधी हा संपूर्ण शासकीय इतमामात पार पडणार आहे. 
इमेज
  धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती "छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे.  विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती. आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्य
इमेज
  सामाजिक भान असणारा खेळाडू कार्यकर्ता :  विकासराव बिडगर             पैशाने श्रीमंत नसेल तरीही मनाने माणुस श्रीमंत असेल तर सामाजिक कार्य घडते. अर्थात दातृत्वात नेतृत्व पण असावेच लागते. खरं एखादा माणूस प्रसिद्धीच्या झोतात आला तर त्याला अहंकार निर्माण होतो. मग तो इतरांपेक्षा स्वतःला वेगळे समजतात. मात्र प्रसिद्धी, पैसा मिळुनही जमिनीवर असणारे खुप कमी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे विकासराव हिरामन बिडगर. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्यक्ती देशसेवा, समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देतात आणि स्वतःला धन्य समजतात. अशापैकी एक आहेत विकासराव हिरामण बिडगर.            परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपुर ही विकासराव बिडगर यांची जन्मभूमी. अगदी शाळेत असल्यापासूनच विकासराव यांना कबड्डीची आवड होती. कबड्डी हा एक मैदानी आणि रांगडा खेळ आहे. या खेळात ताकदीपेक्षा अंगातील चपळता, लवचिकता आणि बुद्धीमत्ता याची कसोटी लागते. या सर्व गोष्टी विकासराव बिडगर यांच्याकडे होत्या. या बळावरच ते बीड जिल्हा संघात आणि पुढे कबड्डीत महाराष्ट्राच्या संघातून खेळले. एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून त्यांची

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
  शाहु महाराजांच्या कार्यामुळे अनेक पिढ्या संपन्न झाल्या-धनंजय आढाव यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)          वंचित, उपेक्षित व शोषित यांना खऱ्या अर्थाने सन्माने जगायला शिकवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण व इतर सुविधा उपलब्ध करुन दारिद्र्याच्या खाईत खिचपत पडलेल्या समाजाला प्रगतीची वाट दाखविली.यामुळे आज अनेक पिढ्या संपन्न झाल्या असल्याचे मत पत्रकार धनंजय आढाव यांनी व्यक्त केले.शाहु महाराजांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.   दिनांक 26 जुन हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे व दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.ए.डी.शेख,प्रा.
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)             लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.            लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्रा.डॉ लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, प्राचार्या देशपांडे, प्रा. देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आषाढी वारीनिमित्त हभप शामसुंदर सोन्नर यांची विशेष लेखमाला: क्रमांक -२

इमेज
विठ्ठल जिवीचा जिव्हाळा ________________________ संपदा सोहळा नावडे मनाला l लागला टकळा पंढरीचा l अशी अवस्था वारक-यांची झाली आहे.  कोणत्याही अपेक्षेशिवाय,  लाभाच्या आशेशिवाय लाखोवारकरी दर वर्षी विठूरायाच्या भेटीसाठी येत असतात. हा विठ्ठल या वारकऱयांचा आहे तरी कोण, त्याचे वारकऱ्यांशी नाते आहे तरी नेमके कोणते, एवढा जिव्हाळा त्यांना या पांडुरंगाबद्दल का वाटतो. त्याचे एकमेव कारण आहे, आषाढी वारीनिमित्त जाणून घेतले पाहिजे. पंढरीचा पांडुरंग एक आलौकिक दैवत आहे. इतर दैवतांचा विचार केला तर त्यांच्या हातात कोणते ना कोणते शस्त्र असते.  त्याने कोणत्या तरी दैत्याचा संहार केलेला असतो. अशा देवाबद्दल एक धाक असतो. वारकरी संतांनी देवाविषयी असलेला धाक, भीती पार पुसून टाकली. त्याला आई, बाप,  चुलता,  सखा  इतकेच  नव्हे तर पती म्हणूनही संबोधले. हे सर्व एका अलौकिक जिव्हाळ्यातून घडले. देव कुणी तरी अगाध आहे. सर्व शक्तीमान आहे. त्याचा कोप झाला तर आपला तो विनाश करील. त्याची मर्जी सांभाळली पाहिजे. त्यासाठी यज्ञ, जप, तप केले पाहिजेत. त्यासाठी गृह त्याग करून वनात गेले पाहिजे. असा देवाविषयी प्रचंड धाक लोकमानसात होता. त्या
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये  राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी परळी प्रतिनिधी- जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये आरक्षणाचे जनक, रयतेचे कैवारी, बहुजन समाजाचे उद्धारक ,लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक ,राजकीय क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांचे कार्य व विचार आजही समाजाला प्रेरणादायी ठरतो.राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.जे व्ही जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ बी व्ही केंद्रे, डॉ.माधव रोडे, डॉ व्हि जे चव्हाण, डॉ रमेश राठोड, डॉ अर्चना चव्हाण, डॉ व्ही.बी गायकवाड,  डॉ गजभारे,  डॉ विश्वनाथ फड,  डॉ व्ही व्ही मुंडे ,डॉ बी एस सातपुते, डॉ एन एस जाधव, प्रा शिंदे, प्रा एस बी रणखांबे, प्रा किरवले यांच्यासह कार्यालयीन प्रमुख श्री अशोक रोडे व शिक्षकेत्त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंदवारी: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेकरीता बीड विभागातून १८० बसेस

इमेज
  आनंदवारी: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेकरीता बीड विभागातून १८० बसेस परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... आषाढी एकादशी निमित्त यात्रेकरीता पंढरपुर येथे जाण्या-येण्यासाठी बीड विभागातून १८० बसेसचे सोय करण्यात आली आहे. भावीक भक्तांसाठी रा. प. बीड विभाग यांचे मार्फत  बीड विभागाचे  आगारातून  यात्रेचा कालावधी दि. २४/०६/२०२३ ते दि. ०४/०७/२०२३ असा असुन मुख्य दिवस एकादशी दि. २९/०६/२०२३ (गुरुवार) तर पोर्णिमा दि. ०३/०७/२०२३ (वार सोमवार) या कालावधीत बसेसची सोय करण्यात आली आहे. बीड २५, परळी २५, धारुर १५,माजलगांव १६, गेवराई२०,पाटोदा२०, आष्टी २०,अंबाजोगाई २५  अशा  एकुण १८० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  तसेच प्रवाशांसाठी पंढरपुर साठी आगाऊ आरक्षणासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  भावीकांच्या मागणीनुसार आवश्कते प्रमाणे बसेस उपलब्ध करण्यात येतील. सदर बाबत प्रवाशांनी संबंधितआगार प्रमुख / स्थानक प्रमुख यांचे शी संपर्क साधावा. प्रवाशांनी रा.प बसनेच प्रवास करावाखाजगीवाहनाने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. ४५ प्रवाशीचा समूह गावातून पंढरपूर करिता उपलब्ध असल्यास आपले गावातून थेट प्रव

तृतीयपंथी बाजारपेठेत आपसात भिडले : वाद गेला पोलिसांत

इमेज
  तृतीयपंथी बाजारपेठेत आपसात भिडले : वाद गेला पोलिसांत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळीच्या बाजारपेठेत फिरणाऱ्या तृतीयपंथीचा वाद मारामारीपर्यंत गेला आणि भरबाजाजारपेठेत तुंबळ हाणामारीची घटना आज  दि.26/06/2023 रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.        पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, आज  दि.26/06/2023 रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास  राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरात तृतीयपंथी इसम एकमेकांशी भिडले. जोराचा वाद व हाणामारी झाली.या भांडणात एक जण जखमी झाला आहे.याप्रकरणी फिर्यादी दिव्या माय बक्स (तृतियपंथी) वय 28 रा. रविवार पेठ अंबाजोगाई यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1)गायत्री 2) योगेश, 3) समिरा, 4) सिमरान व इतर चार यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न- 122/2023 कलम 320,323, 504, 500, 142, 143,149, भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि सपकाळ हे करत आहेत. 
इमेज
  धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद अनेकांची कामे जागच्या जागीच मार्गी! परळी वैद्यनाथ (दि. 26) - आ. धनंजय मुंडे हे आज परळी वैद्यनाथ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात जनता दरबार उपक्रमांतर्गत उपस्थित होते. या जनता दरबारास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. परळी वैद्यनाथ मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न, अडचणी आ. धनंजय मुंडे यांच्या समोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना जागच्या जागी तात्काळ फोन लावून, पत्र देऊन यांसह अन्य मार्गांनी जास्तीत जास्त कामे जागच्या जागीच मार्गी लावण्यात आली.  आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.  यावेळी धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील प्रमुख ठिकाणांवरील वाहतुकीच्या समस्या, त्यावर पोलिसांनी करावयाची उपाययोजना यांसह आदी बाबतही चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.  यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समिती माजी सभापती पिंटू मुंडे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
इमेज
आम्ही शाळकरी:बावन वर्षांनंतर ५२ वर्गमित्रांची भेट; स्नेहसंमेलन उत्साहात परळी/प्रतिनिधी परळी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९७२ ते १९७४ या वर्षांमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा *"आम्ही शाळकरी"* या शीर्षकाखाली आयोजित केलेला स्नेहमेलन सोहळा रविवारी (दि.२५ जून) उत्साहात संपन्न झाला. येथील आर्य वैश्य कार्यालयात घेण्यात आलेल्या सोहळ्याला भावनिक कल्लोळाची किनार लाभली होती. सुमारे 52 वर्षानंतर ५२ भेट आणि परस्परांना आलिंगन देण्याचा मैत्रभेटीचा अपूर्व योग साधला होता.   डॉ. श्रीपाद बुरकुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे आदी माजी विद्यार्थ्यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. वैजनाथ सुत्रावे, गोविंद कौलवार, वाल्मीक भालेराव, अरुण जैस्वाल, दिवाकर धोंड, व्यंकट पारशेवार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाची सुरुवात सकाळी वैद्यनाथ प्रभु दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर शालेय स्तरावरील आठवणींना जागवताना आर्य वैश्य कार्यालयापासून आपल्या शाळेपर्यंत प्रभात फेरी काढली. शाळेमध्ये राष्ट्रगीत गान करून प्रतिज्ञा म्हटली. शाळेतील विद