युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता

 संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न संविधानामूळेच साकार होईल -शामसुंदर महाराज सोन्नर 

संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता

पंढरपूर (प्रतिनिधी) : जात-धर्म,  स्री-पुरुष हे सर्व भेद  विसरून सामाजिक ऐकायाचं  देखण रूप पंढरीची वारीमध्ये पहायला मिळतं. द्वेष, मत्सराचा लवलेशही कुठे दिसत नाही. पंढरीच्या दिंडीत दिसणारा हा एकोपा जेव्हा प्रत्येक गावात दिसेल तेंव्हा संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न साकार होईल. ते संतांनी पाहिलेले स्वप्न फक्त संविधानामूळेच सत्यात येईल, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी पंढरपूर येथे केले. संविधान समता दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

समता भूमी फूलेवाडा येथून निघालेल्या संविधान समता दिंडीचा समारोप पंढरपूर येथील घेरडीकर मठात झाला. अध्यक्षस्थानी भारत महाराज घोगरे गुरुजी होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या संविधान मूल्यांच्या पाऊल खूणा आपल्याला संत साहित्यात जागोजागी पहायला मिळतात. पंढरीच्या वारीमध्येही त्याचाच अविष्कार दिसतो. हा संतांनी पेरलेल्या समतेच्या विचारांचा विजय आहे. पंढरीच्या वारीतील हा समतेचा विचार गावागावात पोहोचेल तेव्हाच संतांनी पाहिलेल्या आनंदी समाजाचे स्वप्न साकार होईल. तो आनंदी दिवस संविधानामूळेच पहायला मिळेल आसा आशावाद शामसुंदर महाराज यांनी व्यक्त केला.

संविधान समता दिंडी मागील संकल्पना संविधान प्रचारक संदीप बर्वे यांनी विषद केली. संविधान प्रचारक महेंद्र रोकडे, गुरुदेव संप्रदायाचे ज्ञानेश्वर रक्षक प्रमुख पाहुणे म्हणूनउपस्थित होते.   सूत्रसंचालन समाधान महाराज देशमुख यांनी केले. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या