ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरहस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन

 श्रीक्षेत्र कपिलधार येथे  ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरहस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन




परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)

                श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन सोमवार (ता.०३) गुरुपौर्णिमा ते सोमवार (ता.०७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

             स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५० वे वर्षे आहे. सोमवार (ता.०३) गुरुपौर्णिमेला या सप्ताहाची सुरुवात होणार असून श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशपुजन करुन चातुर्मास सप्ताहाची सुरुवात होणार आहे. या सप्ताहात पहाटे शिवपाठ, मन्मस्वामी यांची महापूजा, रुद्रपठण, गाथा भजन, प्रवचन, किर्तन, शिवजागर, महाप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ३५ दिवस विविध मान्यवर महाराजांचे किर्तन होणार आहेत. त्याचबरोबर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या सर्व कार्यक्रमास महाराष्ट्रातील वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कपीलधार देवस्थान पंच कमिटी व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान चातुर्मास सप्ताहाचे हे ५० वे वर्षे आहे. यामुळे सुवर्णमहोत्सवी सप्ताहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  ज्ञानयज्ञ सोहळ्यास आजपर्यंत सहकार्य करत असलेले अन्नदाते, किर्तनकार, प्रवचनकार व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार