इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 विद्यावर्धिनी विद्यालयाच्या बाल दिंडीने शक्तीकुंज वसाहतीत अवतरली पंढरी



परळी (प्रतिनिधी)

  आषाढी एकादशीचे निमित्त साधून  विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शक्तीकुंज वसाहतीत बाल दिंडी काढली होती.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत विठुनामाच्या गजरात वसाहतीतील रस्त्यावरुन पालखीसह बालदिंडीने नागरीकांचे लक्ष वेधले.

    विद्यावर्धीनी विद्यालयातील या बाल दिंडीचे प्रस्थान बुधवार दि.28 जुन रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.पालखीतील विठ्ठल प्रतिमेचे पूजन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.जीईटके,बालासाहेब महाराज फड,दीनदयाल नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, पत्रकार धनंजय आढाव,धीरज जंगले,माणिक कोकाटे,प्रा.राजु कोकलगावे सर,संस्थेचे सदस्य एस. बी.भिंगोरे,एम.टी.मुंडे,व पालक श्री सुनीलजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मातेकर,सुमठाणे यांनी गुलाब पुष्प देऊन केले.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत असलेल्या या बाल वारकऱ्यांनी नवीन शक्तीकुंज वसाहतीतील भक्तिगीते व विठ्ठलाचे अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले.यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी फेर धरून फुगड्या खेळल्या.अभंगाच्या तालावर टाळ,मृदंगाच्या गजरात पाऊल खेळून रिंगण खेळले.शेवटी शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा करत विठ्ठलाची आरती होऊन दिंडीचा समारोप झाला.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक,शिक्षीकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....