युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक! 





उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर हा प्रकार घडला असून बाईकस्वाराची सध्या कसून चौकशी केली जात आहेत. या अपघातात बाईकस्वाराला कसलीही दुखापत झाली नसून आदित्य ठाकरे यांच्या गाडीला खरचटलं आहे.
    मिळालेल्या माहितनुसार, आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन येथे येत असताना गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते. तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडक दिली. आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे आले यावेळी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या