पोस्ट्स

MB NEWS: video-अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश!

इमेज
  अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश! 11 जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने शार्प शूटर द्वारा केला खात्मा करमाळ्यातील वांगी नं.4 रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीत ठार मारले.  आष्टी......  बीड - आष्टी, अहमदनगर, सोलापूर, जालना औरंगाबाद जिल्ह्यात 11 जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी ( दि .१८ ) यश आले आहे . करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला .  आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांची शिकार केली होती.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती. काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती .परवा सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला.वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनी च्या काठावरून परत आल्या मार

MB NEWS:परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे परळी १८ (प्रतिनिधी) : संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परळीकरांनी नेहमीच सहकार्य केले असून परळीकरांची ओळख बाहेर जास्त बदनाम केली गेली. मी जेंव्हा संभाजीनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा मला परळीकरांनी जे सहकार्य केले ते मला सदैव आठवणीत राहील असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दि.१८ डिसेंबर २०२० रोजी निरोप समारंभ कार्यक्रमात केले. तर, नूतन पदभार स्वीकारलेले संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाल्याबद्दल त्यांना निरोप दिला. यावेळी त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल व फेटा बांधून व पेढे भरवून करण्यात आला.       पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाली असून त्यांच्या कारकिर्दीबद्दल प्रकाश

MB NEWS: *शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश*

इमेज
  *शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश*             मुंबई, दि. 18 : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.             सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते.             शासकीय निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. ही पदे मंजूर करताना केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निवासी शाळेसाठीच्या शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली. त्यानुसार निवासी शाळेच्या ले

MB NEWS:*युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन*

इमेज
  *युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन* परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)          शहरातील खंडोबा नगर परिसरातील युवा कार्यकर्ते नरेश सुरवसे (वय २८) सध्या नौकरी निमित्त पुणे येथे खाजगी दवाखान्यात नौकरी करत असताना सोमवारी (दि.१४) हार्ट अँटँकने निधन झाले.                       येथील युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (दि.१६) सकाळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश सुरवसे यांच्या मागे आई,वडील, पत्नी, एक मुलगा, बहीण असा परिवार आहे. परळीत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.त्यांच्या निधनामुळे खंडोबा नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MB NEWS:पानगाव (जि. लातूर ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार* *- मंत्री धनंजय मुंडे*

इमेज
 * पानगाव (जि. लातूर ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार* -  मंत्री धनंजय मुंडे* मुंबई दि. 16. लातूर जिल्ह्यातील पानगाव ता. रेणापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.           मंत्रालयात पानगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासा संदर्भात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर चे पालकमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार धीरज देशमुख,  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.             श्री. मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात फक्त नागपूर, मुंबई व पानगाव येथेच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पानगाव येथील चैत्यभूमी परिसरात प्रतिदिन हजारोंच्या संख्येने अनुयायी अस्थ

MB NEWS: *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश* *गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक*

इमेज
 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश* *गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक * मुंबई (दि. १६) ---- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.   या संस्थेच्या संचालक मंडळाची आज मंत्रालयात ना. मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.  सदर बैठकी दरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षण ( २०१८-१९ ) मध्ये संचालक मंडळाने यामध्ये असलेल्या त्रुटींचे निरीक्षण नोंदवले. सदर संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या रुपये १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्रिया चुकीची रा

MB NEWS:'त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार

इमेज
 ' 'त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार  परळी । प्रतिनिधी परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. नाथ टाॅकीज परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. त्या अनुषंगाने पोलीसांनी शोध घेत या बाळाच्या आईला शोधून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान आई मानसिक रुग्ण असुन बाळ सुमारे दीड वर्ष वयाचे आहे परंतु ते कुपोषित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला आता आधार मिळणार आहे. परळीच्या रस्त्यांवर एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रह

MB NEWS:बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलासाठी निधी उपलब्ध होणार ! खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतलीकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीन गडकरी यांची भेट

इमेज
  बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलासाठी निधी उपलब्ध होणार ! खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतलीकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीन गडकरी यांची भेट नवी दिल्ली..... केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांची आज खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेतली.बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. बीड शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची नितांत आवश्यकता आहे.यासंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी केली.तसेच शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे आणि बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण करून रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील केली. मंत्री नितीन गडकरी यांनी  मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना याबाबतीत विना विलंब शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देऊ आणि बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले.

MB NEWS:परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली! सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला ताबा

इमेज
  परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली! सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला ताबा परळी । प्रतिनिधी परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. सदरील घटनेची माहीती घेवून तात्काळ परळी शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. वैद्यनाथ गॅस एजन्सीच्या समोरच्या परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या बेसहारा बालिकेला ताब्यात घेतले आहे. परळीच्या रस्त्यांवर एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रहरापासून त्या बाळाची वैफल्यग्रस्त आई त्याला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती, मात्र दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-

MB NEWS: *संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यापासून सूट - धनंजय मुंडेंचा निर्णय*

इमेज
 *संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यापासून सूट - धनंजय मुंडेंचा निर्णय* मुंबई (दि. १५) ---- : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता असते, परंतु कोविड - १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेत मार्च २०२१ पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यापासून सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या निर्णयाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येतात. या प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचा नियम आहे.  या योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, रोगग्रस्त, वयोवृद्ध व्यक्तींना कोविड - १९ चा धोका अधिक आहे, याचा विचार करून ना. धनंजय मु

MB NEWS:जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे याची मिळते वेळोवेळी साक्ष

इमेज
लोकोत्तर महापुरुष - कुटुंबातील मोठे लोक उसतोडीला फडावर पण घरातल्या   बाळगोपाळांनी आत्मियतेने केली लोकनेत्याची जयंती • जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे याची मिळते वेळोवेळी साक्ष •  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......    लोकोत्तर महापुरुषांच्या जनमाणसाशी जुळलेल्या आत्मिक नात्याची साक्ष अनेक वेळा अनेक प्रसंगातून मिळत असते.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीत तर नेहमीच असे प्रसंग,आठवणी आजही बघायला मिळतात. जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे यांची  वेळोवेळी साक्ष मिळते.असाच एक हळवा व खोलवर आत्मिक नात्याचा प्रसंग बघायला मिळाला.        लोकनेते मुंडे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, कष्टकरी, वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी खर्च केले, ऊसतोड कामगारांचे कैवारी व सर्व सामान्यांमधील ते खरे लोकनेता होते. ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी सध्या फडावर आहे, परंतू लोकनेत्याची जयंती त्यांचे कुटुंबीय विसरले नाहीत. गेवराई तालुक्यातील रामनगर तांड्यावरील ऊसतोड कामगारांच्या बाल गोपाळांनी एकत्रित येऊन आपल्या लोकनेत्याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

MB NEWS:उमेद अभियानातील महिलांना न्याय द्या, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - पंकजाताई मुंडे*

इमेज
 * उमेद अभियानातील महिलांना न्याय द्या, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - पंकजाताई मुंडे* *मुंबईत धरणे आंदोलन करणा-या महिलांच्या लढयाला दिली ताकद!* मुंबई दि.  ------ राज्य सरकारने 'उमेद' अभियानातील महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या मागणीसाठी  आंदोलन करणा-या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे सांगत त्यांनी या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.   ८४ लाख कुटुंबांसाठी काम करणाऱ्या उमेद अभियानाचे खासगीकरण थांबवावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण भागातील हजारो महिलांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. आझाद मैदानात या महिलांनी आजपासून धरणे आंदोलन  सुरू केले आहे.  आंदोलनाची दखल घेऊन पंकजाताई मुंडे यांनी फेसबुक पेजवरून उमेदच्या महिलांची बाजू सरकार समोर मांडली आहे.  आमच्या सरकारच्या काळात उमेद अभियानातील महिलांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती, त्यांनी अभियानातील महिलांशी ऑनलाईन संवादही साधला होता. तसेच  यवतमाळ व औरंगाबाद येथे लाखो महिलांच्या मेळाव्याला संबोधितही केले

MB NEWS:खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी 1 हजार रुपये मंजूर -डॉ.संतोष मुंडे

इमेज
  खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी 1 हजार रुपये मंजूर -डॉ.संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी हजार रुपये मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे दिव्यांग बांधवांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत.       देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषदेच्या वतीने 500 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोरोनाच्या संकटात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे, न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कर

MB NEWS:शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव -------------------------------

इमेज
 ---------------- शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव -------------------------------- बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम  ---------------- परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- ‘राजकीय प्रवासाच्या पाऊल वाटेवरील, प्रारंभीची साथ आपली...यशोशिखरावर घेऊन गेली सह्याद्रीच्या सुपूत्राला..!’ या शब्दात राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाल्यानंतर त्यांच्या विचार आणि कार्यावर प्रभावित होऊन त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून काम करणार्‍या परळीतील सुरूवातीच्या काळातील पक्ष कार्यकर्त्यांचा शरद पवार विचार मंचच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.  खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि.12) हा उपक्रम परळीत राबवण्यात आला. श्री पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाल्यानंतर त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून येथे काम करणारे डॉ.सुरेश चौधरी, बाबुराव मुंडे, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, बाळासाहेब देशमुख, जनार्धनराव गाडे गुरूजी, श्री सिरसाट,सिराजोद्द

MB NEWS:*⭕तासाभरानंतर You Tube, Google ची सेवा पुन्हा सुरु⭕*

इमेज
 *⭕तासाभरानंतर You Tube, Google ची सेवा पुन्हा सुरु⭕*  मुंबई : YouTube ची सेवा आज १४ डिसेंबर २०२० रोजी, साधारण तासभर बंद होती, भारतात दुपारी ५ नंतर बंद झालेली ही सेवा ६ वाजून ५ मिनिटांनी सुरु झाली. जगभरात काही ठिकाणी ही सेवा बंद होती, या पाठोपाठ गूगल आणि गूगलमीटची सेवा देखील बंद होती, यामुळे YouTube दिसत नाहीय, सेवा का बंद आहे, यावर जगभरात अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहे. न्यूज एजन्सी रायटरने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात १२ हजार लोकांना याचा फटका बसला आहे. हा आकडा तसा कमी वाटत असला तरी लवकरच अपडेट आकडा येणार आहे.  YouTube ची सेवा काही मिनिटांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद झाली आहे. Google चा YouTube हा सर्वात मोठा व्हीडीओ प्लॅटफॉर्म आहे. यामुळे अनेक ठिकाणी युझर्स, सब्सस्क्राईबर्स गोंधळात पडले आहेत. यूट्यूब क्रिएटर्सना देखील याचा धक्का बसला आहे. YouTube अनेक वेळा तांत्रिक दुरुस्ती असल्यासं YouTube क्रिएटर्सना कळवत असतं, पण यावेळी असं काहीही कळवण्यात आलेलं नाही. YouTube काय तांत्रिक अडचण अचानक आली आहे, याविषयी google कडून काहीही कळवण्यात आलेलं नाही.  YouTube वर सध्या जगभरात सर्वात जास

MB NEWS: video-गंगाखेड रोडवर करम-निळा जवळ भिषण अपघात;चार जण जागेवर ठार

इमेज
  गंगाखेड रोडवर करम-निळा जवळ भिषण अपघात;चार जण जागेवर ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन चार जण जागेवर ठार झाल्याची घटना रात्री ८.०० वा. सुमारास घडली आहे. सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.     गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान खोरी नावाने ओळखले जाणार्या ठिकाणी एक अॅटोरिक्षा व टिप्परची जोराची धडक होऊन भयानक अपघात घडला आहे. . या भिषण आपघातात अॅटोरिक्षातील चार जण जागीच गतप्राण झाले आहेत. मयत अंबाजोगाई चे असल्याचे प्रथमदर्शनी समजते. अॅटोरिक्षातील लोक गंगाखेड जवळील झोलपिंपरी येथे एका लग्नाहून अंबाजोगाईला परत जात होते अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हायवे पोलीस व सोनपेठ पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. - ------++video________

MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन

इमेज
  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांचे काका स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे जाऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले.  गोरगरीब, दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा, संघर्षाचा वसा आणि प्रेरणा घेऊन काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही असे म्हणत ते त्रिवार नतमस्तक झाले.

MB NEWS:लोकनेत्याच्या जयंतीदिनी* *पंकजाताई मुंडे यांनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात* *सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

इमेज
 * लोकनेत्याच्या जयंतीदिनी* *पंकजाताई मुंडे यांनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात*  *सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद* परळी दि. १२ ------- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी  गोपीनाथ गडावर आयोजित शिबीरात स्वतः रक्तदान करून रक्तदान महायज्ञाला सुरवात केली, त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हयासह राज्यभरात ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिबीरे  आयोजित करून उत्स्फूर्त रक्तदान केले. दरम्यान, आज सकाळपासूनच लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेतले.     लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गड विविध प्रकारच्या फुल माळांनी व विद्युत रोषणाईने सजला होता.  यंदा कोरोनामुळे दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नव्हता, तथापि सोशल डिस्टन्स व कोरोनाच्या नियमाचे पालन करून सर्वांना दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळपासूनच जिल्हयासह राज्यभरातील हजारो कार्यकर्त्

MB NEWS:खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन

इमेज
  खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन परळी (दि. 10) --- : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांचा 80 वा वाढदिवस परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील मोंढा मैदान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 81 किलो चा केक कापून साजरा करण्यात येणार आहे.  मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात 12 डिसेंबर रोजी मोंढा मैदान येथे अभूतपूर्व विद्युत रोशनाई करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गरजू कुटुंबातील 5000 महिलांना साडी वाटप, छञपती शिवाजी महाराज चौक व राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे पेढे वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी यांना प्रमाणपञाचे वाटप, यांसह खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रमुख कार्यक्रमाचे लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.  यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची परळी नगर परिषदेचे ग

MB NEWS:साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

इमेज
  साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद परभणी स्थागुशा व संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी..              संपूर्ण मराठवाड्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या दोन कुख्यात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. परभणी स्थानिक गुन्हे शाखा व संभाजी नगर पोलीस ठाणे परळी यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी केली आहे.        गंगाखेड येथील एका साखळी चोरीच्या तपासात परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळीत दाखल होऊन उड्डाणपुलाखालून दोन कुख्यात आरोपींना संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.रेहान खान पठाण, इरफान खान शरीफ खान अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MB NEWS:*आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी* *_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_*

इमेज
 *आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी*  *_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    आशा व गटप्रवर्तक यांचे  मानधन वाढीतील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर १६ डिसेंबर रोजी निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.     याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातत्याने मेहनत व सेवा बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनाचा मोबदला व शासनाने जाहीर केल्यानुसार वाढीव मानधनाच्या फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी असे आदेश असतानाही अद्याप ही रक्कम मिळाली नाही.डिसेंबर २०२० अखेर पर्यंत फरकवाढीतील रक्कम देण्यात यावी, गटप्रवर्तक यांना २५ रुपये दैनंदिन भत्ता गेल्या एक वर्षापासून मिळालेला नाही तो देण्यात यावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेचा मोबदला द्यावा, कुष्ठरोग,क्षयरोग शोध मोहीम सर्व्हेचा मोबदला पुर्वीप्रमाणेच १७५ रुपये देण्यात यावा, गटप्रवर्तक यांना स्टेशनरी साठीचे वार्षिक ३००० र

नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी

इमेज
  माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी राजेंद्र सोनी यांची नियुक्ती •नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी परळी वैजनाथ - राज्यातील माहेश्वरी समाजाची मातृसंस्था असलेल्या माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी परळी येथील राजेंद्र सोनी यांची निवड करण्यात आली आहे.धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेणारे तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे परळी नप चे स्वीकृत सदस्य म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री,पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.दरम्यान या नियुक्ती नंतर माझ्या वरील जवाबदारी वाढली असून,माहेश्वरी समाजातील प्रत्येक घटकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष ऍड गोपाल कासट यांचे आभार व्यक्त केले आहेत.

MB NEWS:बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : सहा तालुके निरंक ; परळीचाही आजचा आहवाल निरंक

इमेज
  बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : सहा तालुके निरंक ; परळीचाही आजचा आहवाल निरंक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दैनंदिन covid-19 अहवाल हा अर्धा जिल्हा निरंक आला आहे. या अहवालात परळी तालुक्याची संख्या निरंक आली आहे.          आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात केवळ २२ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये परळी तालुक्याची संख्या निरंक आहे. जिल्ह्याची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोना संसर्गाची साखळी मात्र संपुर्णतः सुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS:राज्यव्यापी अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बैठकीचे आयोजन --- सचिन रणखांबे

इमेज
  राज्यव्यापी अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बैठकीचे आयोजन --- सचिन रणखांबे बीड (प्रतिनिधी) दि.10 महाराष्ट्रातील सर्व अनुदानित वसतीगृह कर्मचारी बांधवांना वेतनश्रेणीची सुवर्णसंधी या संधीचा पुरेपुर फायदा महाराष्ट्रातील तमाम वसतीगृह कर्मचारी बंधू-भगिनींनी घ्यावा व सर्वांच्या विचाराने वेतन श्रेणी विषयक मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यासाठी निश्चीत मार्गाच्या अवलंबनासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांनी सहकार्य करावे व दि.१२ डिसेंबर २०२० रोजी १२.०० वाजता वेतनश्रेणीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे. सचिन रणखांबे यांनी  आवाहन केले आहे. बीड जिल्हा अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जुने-नवीन पदाधिकारी व वसतीगृह कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वरील तारखेस मागासवर्गीय मुलाचे वसतीगृह सावतामाळी चौक, फुलाई नगर, मुनोत नेत्रालया समोर बीड या ठिकाणी वरील तारखेस व वेळेत वेतनश्रेणी विषयक अखेरचा पर्याय निवडण्यासाठी राज्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी बैठकीस हजेरी लावणे अनिवार्य आहे. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा.धनंजय मुंडे यांनी नागरगोजे देवा यांना वेतनश्रेणीविषयक दिलेला शब्दाच्या

MB NEWS:चाकूचा धाक दाखवून चार महिलांचे दागिने लांबवले* *माजलगाव तालुक्यातील पायतळवाडीची घटना*

इमेज
 * चाकूचा धाक दाखवून चार महिलांचे दागिने लांबवले*   *माजलगाव तालुक्यातील पायतळवाडीची घटना*   माजलगाव : शेतातून घरी परतणार्‍या चार महिलांना दुचाकीवरुन आलेल्या एकाच चोरट्याने चाकुचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. बुधवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पायतळवाडी (ता.माजलगाव) शेत शिवारात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान अज्ञाताविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.