MB NEWS:'त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार

 ''त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार 



परळी । प्रतिनिधी

परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. नाथ टाॅकीज परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. त्या अनुषंगाने पोलीसांनी शोध घेत या बाळाच्या आईला शोधून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान आई मानसिक रुग्ण असुन बाळ सुमारे दीड वर्ष वयाचे आहे परंतु ते कुपोषित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला आता आधार मिळणार आहे.

परळीच्या रस्त्यांवर एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रहरापासून त्या बाळाची वैफल्यग्रस्त आई त्याला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती, मात्र दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच वेळ त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करूनही ती न सापडल्यामुळे परळी शहर पोलिसांना याबाबत माहीती देण्यात आली. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी तात्काळ पोलिस वाहन व सोबत हवालदार तोटेवाड, महिला पोलिस कॉन्स्टेबला डोरले यांना पाठवून बाळाला तब्यात घेतले होते. आता ''त्या" चिमुकलीची आई सापडली असुन जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला  आधार मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार