MB NEWS:जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे याची मिळते वेळोवेळी साक्ष

लोकोत्तर महापुरुष - कुटुंबातील मोठे लोक उसतोडीला फडावर पण घरातल्या   बाळगोपाळांनी आत्मियतेने केली लोकनेत्याची जयंती



• जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे याची मिळते वेळोवेळी साक्ष • 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

   लोकोत्तर महापुरुषांच्या जनमाणसाशी जुळलेल्या आत्मिक नात्याची साक्ष अनेक वेळा अनेक प्रसंगातून मिळत असते.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीत तर नेहमीच असे प्रसंग,आठवणी आजही बघायला मिळतात. जनसामान्यांच्या मनामनातील लोकनेता म्हणजे फक्त गोपीनाथराव मुंडे यांची  वेळोवेळी साक्ष मिळते.असाच एक हळवा व खोलवर आत्मिक नात्याचा प्रसंग बघायला मिळाला.

     



 लोकनेते मुंडे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, कष्टकरी, वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी खर्च केले, ऊसतोड कामगारांचे कैवारी व सर्व सामान्यांमधील ते खरे लोकनेता होते. ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी सध्या फडावर आहे, परंतू लोकनेत्याची जयंती त्यांचे कुटुंबीय विसरले नाहीत. गेवराई तालुक्यातील रामनगर तांड्यावरील ऊसतोड कामगारांच्या बाल गोपाळांनी एकत्रित येऊन आपल्या लोकनेत्याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.केवढे ते प्रेम..केवढी ती श्रध्दा  असेच या प्रसंंगांचे वर्णन करावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !