युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे

 परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार



कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे




परळी १८ (प्रतिनिधी) : संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परळीकरांनी नेहमीच सहकार्य केले असून परळीकरांची ओळख बाहेर जास्त बदनाम केली गेली. मी जेंव्हा संभाजीनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा मला परळीकरांनी जे सहकार्य केले ते मला सदैव आठवणीत राहील असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दि.१८ डिसेंबर २०२० रोजी निरोप समारंभ कार्यक्रमात केले. तर, नूतन पदभार स्वीकारलेले संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाल्याबद्दल त्यांना निरोप दिला. यावेळी त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल व फेटा बांधून व पेढे भरवून करण्यात आला.

      पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाली असून त्यांच्या कारकिर्दीबद्दल प्रकाश टाकण्यात आला. परळीतील दोन वर्षाच्या कार्यकाळात गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. सन २०१८ - ११७, २०१९ - ८८, व सन २०२० नोव्हेंबर - ७५ गुन्ह्यांची नोंद, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान आणि परळीत मूकनायक पुरस्काराने सन्मानित. त्याची ओळख कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून नेहमी राहील.


      यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. प्रदीप एकसिंगे, अशोक खरात, मोहन जाधव, संभाजी नगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. नारायण गित्ते, चांद मेंडके, सचिन सानप, व्यंकट भताने, रंगनाथ राठोड, स्वप्निल आडे , बाबासाहेब आचार्य, विलास देशमुख, दत्ता गित्ते, शत्रुघ्न शिंदे, दहिवाळ मॅडम, मस्के, केदार मॅडम, आदींसह ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, रानबा गायकवाड, जगदीश शिंदे, भगवान साकसमुद्रे, धनंजय अरबुने, दत्तात्रय काळे, बाळासाहेब फड, बाळकिशन सोनी, प्रा.प्रवीण फुटके, गणेश आडोदे, संभाजी मुंडे, महादेव शिंदे, नितीन जाधव, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात संभाजी नगर पोलिस स्टेशन व पत्रकारांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पो.उप.नि. चांद मेंडके यांनी मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या