नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी

 माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी राजेंद्र सोनी यांची नियुक्ती



•नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी



परळी वैजनाथ - राज्यातील माहेश्वरी समाजाची मातृसंस्था असलेल्या माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी परळी येथील राजेंद्र सोनी यांची निवड करण्यात आली आहे.धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेणारे तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे परळी नप चे स्वीकृत सदस्य म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत.


महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री,पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.दरम्यान या नियुक्ती नंतर माझ्या वरील जवाबदारी वाढली असून,माहेश्वरी समाजातील प्रत्येक घटकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष ऍड गोपाल कासट यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !