MB NEWS: *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश* *गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक*

 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश*



*गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक*


मुंबई (दि. १६) ---- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

 


या संस्थेच्या संचालक मंडळाची आज मंत्रालयात ना. मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. 

सदर बैठकी दरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षण ( २०१८-१९ ) मध्ये संचालक मंडळाने यामध्ये असलेल्या त्रुटींचे निरीक्षण नोंदवले.


सदर संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या रुपये १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्रिया चुकीची राबविणे, खर्चाच्या देयकांवर संबंधीताच्या स्वाक्षऱ्या नसणे किंवा त्यासोबतचे व्हाऊचर न ठेवणे, खर्चाचा मेळ न लागणे, सनदी लेखापाल यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन न देणे या बाबी बाबतचे सनदी लेखापाल यांचे निष्कर्ष समोर आल्याने ना. मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरवून, प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी व सदर चौकशी समितीमध्ये आयुक्त, समाज कल्याण, पुणे व महासंचालक, बार्टी यांचा समावेश करावा. तसेच सदर समितीने एक महिन्यात चौकशी अहवाल दिल्यानंतर तो पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.


आजच्या या संचालक मंडळाच्या बैठकीस राज्यमंत्री विश्वजीत कदम विभागाचे सचिव श्याम तागडे, आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार