युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव -------------------------------

 ----------------

शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील

सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव

--------------------------------

बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम 

----------------



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-

‘राजकीय प्रवासाच्या पाऊल वाटेवरील, प्रारंभीची साथ आपली...यशोशिखरावर घेऊन गेली सह्याद्रीच्या सुपूत्राला..!’ या शब्दात राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाल्यानंतर त्यांच्या विचार आणि कार्यावर प्रभावित होऊन त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून काम करणार्‍या परळीतील सुरूवातीच्या काळातील पक्ष कार्यकर्त्यांचा शरद पवार विचार मंचच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.

 खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि.12) हा उपक्रम परळीत राबवण्यात आला. श्री पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाल्यानंतर त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून येथे काम करणारे डॉ.सुरेश चौधरी, बाबुराव मुंडे, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, बाळासाहेब देशमुख, जनार्धनराव गाडे गुरूजी, श्री सिरसाट,सिराजोद्दीन मुल्ला, श्री तांदळे आदींचा त्यांच्या घरी जावून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या उपक्रमाचे या मान्यवरांनी कौतुक तर केलेच शिवाय जुन्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमाचे आयोजक शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी उपक्रमाबाबतची भूमिका स्पष्ट केली. यावेळी श्री देशमुख यांच्यासह विचार मंचचे शहराध्यक्ष श्रीकांत माने, लक्ष्मण कलमे, पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या