MB NEWS: video-अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश!

 अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश!



11 जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने शार्प शूटर द्वारा केला खात्मा


करमाळ्यातील वांगी नं.4 रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीत ठार मारले.


 आष्टी......


 बीड - आष्टी, अहमदनगर, सोलापूर, जालना औरंगाबाद जिल्ह्यात 11 जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी ( दि .१८ ) यश आले आहे . करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला .

 आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांची शिकार केली होती.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती.

काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती .परवा सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला.वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनी च्या काठावरून परत आल्या मार्गाने निघाला होता.गेल्या तीन दिवसापासून त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता.त्याला उजनीच्या पाण्यामुळे पुढे जाण्यास अडचण निर्माण होत होती त्यामुळे तो परत मागे आल्या रस्त्याने फिरला होता .

    अखेर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वन विभागाच्या पथकाला या बिबट्याला ठार मारण्यात यश आले असून अखेर नरभक्षक बिबटयाला वनविभाने वांगी नं.4 रांखुडे वस्ती येथे पांडुरंग रांखुडे यांच्या केळीत ठार मारले. परवा सायंकाळी या भागात शेतकऱ्यांना बिबटया दिसल्यानंतर रात्रीपासून त्याला मारण्यासाठी प्रयत्न सुरू होते .सोलापूर वन विभाग आणि पुणे येथील रायफल क्लब चे चंद्रकांत मंडलिक यांच्या शार्प शूटर च्या मदतीने त्याला ठार मारण्यात आले .

 11 बळी घेणाऱ्या बिबट्याला आज वन विभाग आणि शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालण्यात आल्या . आणि या नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत झाला . असून या परिसरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.




डॉ . धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध 


करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे . डॉ . धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला . वांगी नं .४ रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले . गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती . अकलूज येथील डॉ . धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते . वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला . मात्र , अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !