MB NEWS:साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

 साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद



परभणी स्थागुशा व संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कामगिरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      

       संपूर्ण मराठवाड्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या दोन कुख्यात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. परभणी स्थानिक गुन्हे शाखा व संभाजी नगर पोलीस ठाणे परळी यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी केली आहे.



       गंगाखेड येथील एका साखळी चोरीच्या तपासात परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळीत दाखल होऊन उड्डाणपुलाखालून दोन कुख्यात आरोपींना संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.रेहान खान पठाण, इरफान खान शरीफ खान अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या