युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी 1 हजार रुपये मंजूर -डॉ.संतोष मुंडे

 खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी 1 हजार रुपये मंजूर -डॉ.संतोष मुंडे




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी हजार रुपये मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे दिव्यांग बांधवांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत.

      देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषदेच्या वतीने 500 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोरोनाच्या संकटात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे, न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड, मुख्यधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांचे दिव्यांग बांधव संघटना व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना आभार मानले आहेत. तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी आपले आँनलाईन प्रमाणपत्र व बँक पासबुक झेरॉक्स नगर परिषद कार्यालयात जमा करावे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या