MB NEWS:*आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी* *_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_*

 *आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी* 



*_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   आशा व गटप्रवर्तक यांचे  मानधन वाढीतील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर १६ डिसेंबर रोजी निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातत्याने मेहनत व सेवा बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनाचा मोबदला व शासनाने जाहीर केल्यानुसार वाढीव मानधनाच्या फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी असे आदेश असतानाही अद्याप ही रक्कम मिळाली नाही.डिसेंबर २०२० अखेर पर्यंत फरकवाढीतील रक्कम देण्यात यावी, गटप्रवर्तक यांना २५ रुपये दैनंदिन भत्ता गेल्या एक वर्षापासून मिळालेला नाही तो देण्यात यावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेचा मोबदला द्यावा, कुष्ठरोग,क्षयरोग शोध मोहीम सर्व्हेचा मोबदला पुर्वीप्रमाणेच १७५ रुपये देण्यात यावा, गटप्रवर्तक यांना स्टेशनरी साठीचे वार्षिक ३००० रुपये खर्च नियमित देण्यात यावा आदी मागण्यांसाठी  तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र बीड जिल्हा आशा वर्कर युनियन च्या वतीने देण्यात आला आहे.

    या निवेदनावर सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा रेवले, आशा मुंडे,छाया रणदिवे,अनिता गिराम,हेमा काळे, उमा वाघमारे, आशा लांडगे, सत्यभामा सुरवसे, मिरा स्वामी, लता आघाव आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !