MB NEWS:बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलासाठी निधी उपलब्ध होणार ! खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतलीकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीन गडकरी यांची भेट

 

बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलासाठी निधी उपलब्ध होणार !



खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतलीकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीन गडकरी यांची भेट

नवी दिल्ली.....

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांची आज खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेतली.बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.


बीड शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची नितांत आवश्यकता आहे.यासंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी केली.तसेच शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे आणि बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण करून रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील केली.

मंत्री नितीन गडकरी यांनी  मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना याबाबतीत विना विलंब शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देऊ आणि बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !