युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली! सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला ताबा

 परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली!



सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला ताबा

परळी । प्रतिनिधी

परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. सदरील घटनेची माहीती घेवून तात्काळ परळी शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. वैद्यनाथ गॅस एजन्सीच्या समोरच्या परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या बेसहारा बालिकेला ताब्यात घेतले आहे.

परळीच्या रस्त्यांवर एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रहरापासून त्या बाळाची वैफल्यग्रस्त आई त्याला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती, मात्र दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच वेळ त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करूनही ती न सापडल्यामुळे परळी शहर पोलिसांना याबाबत माहीती देण्यात आली. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी तात्काळ पोलिस वाहन व सोबत हवालदार तोटेवाड, महिला पोलिस कॉन्स्टेबला डोरले यांना पाठवून बाळाला तब्यात घेतले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या