MB NEWS:खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन

 खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा



वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन


परळी (दि. 10) --- : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांचा 80 वा वाढदिवस परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील मोंढा मैदान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 81 किलो चा केक कापून साजरा करण्यात येणार आहे. 


मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात 12 डिसेंबर रोजी मोंढा मैदान येथे अभूतपूर्व विद्युत रोशनाई करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गरजू कुटुंबातील 5000 महिलांना साडी वाटप, छञपती शिवाजी महाराज चौक व राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे पेढे वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी यांना प्रमाणपञाचे वाटप, यांसह खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रमुख कार्यक्रमाचे लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. 


यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखाली ना. मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात बैठक पार पडली, या बैठकीत उत्सव समिती स्थापन करण्यात आली


या समितीत जि.प.गटनेते अजय मुंडे, जि. प. अध्यक्ष शिवाजी सिरसाट, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्ष दत्ता आबा पाटील, रा. काँ. पार्टी शहरअध्यक्ष बाजिराव भैय्या धर्माधिकारी, रा.काँ.पार्टी परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी, नगरसेवक शरद मुंडे, दिपक देशमुख, चंदुलाल बियाणी, न.प.सभपती भाऊसाहेब कराड, किशोर पारधे, जाबेर खान पठाण, कृ.उ.बा.सभापती अँड गोविंदराव फड, संचालक माऊली गडदे, माणीक फड, रा.काँ.जेष्ठ नेते राजेश्वर चव्हाण, रा.यु.काँ. विलास मोरे, प्रदेश सरचिटणीस रंजीत लोमटे, परळी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्ष सुर्यभान मुंडे, जि.प.सदस्य प्रा. मधुकर आघाव, मुंडे, संजय निराधार गांधी समिती चेअरमन राजाभाऊ पौळ, सदस्य नितीन मामा कुलकर्णी, प्रभाकर पौळ, परळी पंचायत समिती उपसभापती पिंटू मुंडे, सदस्य मोहन सोळंके, विश्वांभर फड, अरुण जगताप,चंद्रकांत कराड यांचा समावेश आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार