पोस्ट्स

MB NEWS-एसआयओ व जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

इमेज
  एसआयओ व जमाते इस्लामी हिंद  यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबीर परळी वै.( प्रतिनिधी) दि. 10 एप्रिल 2021: महाराष्ट्रावर असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन जमाते ईस्लामि हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास एसआयओचे महाराष्ट्र साऊथ झोन प्रमुख सलमान खान साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरास तरूण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसआयओ व जमाते इस्लामि हिंद या  सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात  रक्तदान शिबीरांच्या आयोजनांचे सत्र सुरू आहे. सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती याप्रसंगी बोलताना सलमान खान यांनी दिली. आपल्या संदेशात पवित्र कुरआन चा दाखला देत ते म्हणाले,"तुम्ही एका मानवाला वाचवले, तर तुम्हाला संपुर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते." राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन जनतेला केल

MB NEWS- *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर*

इमेज
 *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर झाली आहे.       प्रभाग क्रमांक दोन मधील शिवनगर, भिमानगर, झमझमपार्क,  बरकत नगर भागात  प्रभाग क्र 2 मध्ये आंगणवाडी मंजुर करण्यात आली आहे.  माजी उपनगराध्यक्ष आयुबखान पठाण यांच्या प्रयत्नातुन या अंगणवाडी ला मंजुरी मिळाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भागात अंगणवाडी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबख

MB NEWS-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवाद कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*

इमेज
 * भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*  _परळी / प्रतिनिधी_  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात  शहर व गावपातळीच्या प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.14 एप्रिल हा दिवस बहुजनांना प्रेरणा देणारा दिवस आहे.चालु असलेल्या लाॕकडाऊन मध्ये शिथिलता देऊन बाबांच्या अभिवादन करण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व प्रत्येक वस्तीत असलेल्या  बौध्द विहारात ध्वजारोहण,पुजापाठ करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी व साहित्य खरेदी करीता किमान दोन दिवस बाजार खुला करावा अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संपादक मोहन व्हावळे यांनी केली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घराघरात उत्साहचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, मिठाई, इतर पदार्थांची बनवले जातात त्यामुळे  व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात अशी विनंती बीड जिल्हाधिकारी यांना केली आहे.निश्चितच आपण जर परवानगी दिली तर कोरोनाच्या पार्श्वभ

MB NEWS-कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल

इमेज
  कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल        नेकनूर,प्रतिनिधी....      कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न समारंभ करणं महागात पडले आहे. राज्यात कोविडविषयक कडक निर्बंध लागू आहेत. जमावबंदी, संचारबंदी लागू आहे.या परिस्थितीत ही गर्दी जमवुन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रकरणी नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी  विवाहासाठी  मांजरसुंबा हे  ठिकाण निवडले होते. मांजरसुंबा येथील बीड रोड वर असणाऱ्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या  प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून आली. यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आदी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून नवरा, नवरी, त्यांचे आई-वडील,  मामा , लग्न लावणारे ब्राह्मण,  मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकावर

MB NEWS-सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय

इमेज
सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश  न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने  प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय   परळी दि. ७(प्रतिनिधी)सध्या परळी शहरात कोरोनांची दुसरी लाट रौद्ररूप घेत असुन दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी केले आहे. त्याअनुषंगाने नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी न.प. गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या कडे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे साहेब यांना सुचना केली. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून या आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे केली आहे.  सध्या परळी शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. आणि उपज

MB NEWS-सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे

इमेज
  सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित  द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे ---------------- परळी वैजनाथ, दि.  (प्रतिनिधी)ः- परळी नगर पालिकेत सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे पालिकेकडून येणे असलेली विविध देयके त्वरित देवून या कर्मचार्‍यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे. पालिका कार्यालयात दिलेल्या निवेदनात प्रा.मुंडे यांनी ही मागणी केली आहे. आयुष्यभर पालिकेत सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची सेवानिवृत्तीनंतर परळी पालिका प्रशासनाने हेळसांड लावली आहे. सेवानिवृत्त होवून अनेक महिने जावूनही या कर्मचार्‍यांना पालिकेकडून येणे असलेले भविष्य निर्वाह निधी व इतर देयके वेळेवर दिली जात नाहीत. कर्मचारी सतत यासाठी पालिका कार्यालयात चकरा मारत असतात. गेल्या कांही वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पालिकेने अद्याप ही देयके दिलेली नाहीत. पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून ही देयके त्वरित अदा करावीत अशी मागणी प्रा.मुंडे यांनी या निवेदनात केली आहे.

MB NEWS-दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे* *पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन*

इमेज
 * दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे* *पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन* परळी (दि. ०७) ---- : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.   जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.  बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन/व्हेंटिलेटर्स उप

MB NEWS-लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात आणखी लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज दोन लसीकरण केंद्र वाढवा- चंदुलाल बियाणी

इमेज
  लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात आणखी लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज दोन लसीकरण केंद्र वाढवा- चंदुलाल बियाणी परळी (प्रतिनिधी-) परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरु झाला आहे.शहरात शासकीय स्तरावर फक्त उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होत असून वाढत्या संख्येमुळे लसीकरणावर मर्यादा येत असून यावेळी वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणखी  लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. दोन ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.        परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर  उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण द

MB NEWS-ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीचा परळी शहरात विजेचा लपंडाव

इमेज
  ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीचा परळी शहरात विजेचा लपंडाव परळी : दि 6 अनुप कुसूमकर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून विज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे.ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांसह लहान बालक व वयोवृध्द नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विज वितरण कंपनी दिवसभरात किती वेळेस लाईट घालवते याचे काही वेळापत्रक राहिलेले नाही. थकबाकीदार ग्राहकांची लाईट कट करण्यासाठी दिवसात 20-25 वेळा लाईट बंद करण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली परमिट घेवून विज कट करतात पण विज कट करण्याचे वेळापत्रक काही केलेले नाही. विज कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले गेले आहेत. वितरण कंपनीने विज घालवण्याचे वेळापत्रक तयार करून ग्राहकांसाठी ते वृत्तपत्रात छापली पाहिजे. वितरण कंपनी कार्यालयात एखाद्या ग्राहकाने फोन केला तर तेथील अधिकारी वा कर्मचारी यांनाही लाईट पुरवठा सुरू आहे कि नाही हे माहिती नसते हे विशेष. गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात

MB NEWS-दहावी बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर

इमेज
  दहावी बारावी  परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके  तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर परळी वैजनाथ, प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत चालू असलेल्या पदवी परीक्षा व एप्रिल अखेर सुरू होणाऱ्या दहावी बारावी च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची दुकाने, तसेच जिल्हा व परळी शहरातील चालू असलेल्या विविध कार्यालय, बँक, शासकीय दवाखाना यांना लागणाऱ्या स्टेशनरी साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात मंगळवार पासून अचानक लॉकडाऊन करून किराणा, दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली. परंतु सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत पदवी स्तरीय परीक्षा ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावी च्या लेखी परीक्षा एप्रिल अखेर चालू होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, परीक्षा पॅड, पेन व इतर शैक्षणीक साहित्य लॉकडाऊन मुळे पुस्तके व स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे

MB NEWS- *भाजपा स्थापना दिनानिमित्त पंकजाताई, खा. प्रितमताई मुंडे यांचा कार्यकर्त्यांशी व्हर्चुअल संवाद* *'अंत्योदय ' हेच ध्येय बाळगून निर्भिडपणे काम करा*

इमेज
 *भाजपा स्थापना दिनानिमित्त पंकजाताई, खा. प्रितमताई मुंडे यांचा कार्यकर्त्यांशी व्हर्चुअल संवाद* *'अंत्योदय ' हेच ध्येय बाळगून निर्भिडपणे काम करा* मुंबई । दिनांक ०६। भारतीय जनता पक्ष हा संस्कारावर आधारलेला पक्ष आहे. राष्ट्र प्रथम आणि 'सेवा ही संघठन' हिच भाजपची खरी ओळख आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवून देणा-या विभूतींनी आपल्याला अंत्योदया चा मूलमंत्र दिला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी 'अंत्योदय' हेच ध्येय बाळगून निर्भिडपणे काम करावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.    भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांशी व्हर्चुअल संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. संवादापूर्वी त्यांनी वरळी येथील कार्यालयात भाजपचा ध्वज फडकावला तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्थापना दिन साजरा केला. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी यावेळी त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.   भाजपा आज आपला ४१ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. पक्ष विस्तारासाठी आतापर्यं

MB NEWS-अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट नाहीच: मिनी नाही अंशतः नाही; अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात लाॅकडाउनच !

इमेज
  अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट नाहीच: मिनी नाही अंशतः नाही; अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात  लाॅकडाउनच   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर आता राज्य शासनाचा 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन चा निर्णय आल्याने जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणे आदेश काढले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याला अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट मिळणार असं वाटत होतं तरी सुट मिळणार नाहीच.  उद्यापासून मेडिकल,किराणा,भाजीपाला अशा अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात पुढील २५दिवस लाॅकडाउनच असणार आहे.              अगोदरच बीड जिल्ह्यात तब्बल दहा दिवसाचा लॉक डाऊन लावण्यात आला.30 मार्च नंतर काहीसा कमी केला गेला,मात्र त्यानंतर 4 एप्रिल रोजी राज्य शासनाने जे आदेश दिले त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने नवे आदेश न काढता जिल्ह्याचा लॉक डाऊन हटवला जात असल्याचे सांगितले, त्यामुळे बीड जिल्ह्याला राज्याच्या लॉक डाऊन मधून वगळले म्हणून व्यापारी,सामान्य माणूस खुश होता . पण अवघ्या बारा तासात जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजता नवे आदेश काढत लाॅकडाउन घोषित केला. प्रशासनाने शनिवार रविवारी संपूर्ण लॉक

MB NEWS- *..तर या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील - पंकजाताई मुंडे*

इमेज
  *..तर या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील - पंकजाताई मुंडे*  मुंबई । दिनांक०५। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, पण हे सरकारला जरी उशीरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामे घेतले तरच दुरुस्त म्हणता येईल असा टोला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी लगावला आहे.    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंकजाताई मुंडे यावर ट्विट करत ' देर आये पर दुरुस्त नहीं आये ', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल असा टोला लगावला आहे. ••••

MB NEWS-कोरोना परिस्थितीत जपली परंपरा: पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने कोविड नियमांचे पालन करून गावातच केला नाथषष्टी उत्सव

इमेज
कोरोना परिस्थितीत जपली परंपरा: पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने कोविड नियमांचे पालन करून गावातच केला नाथषष्टी उत्सव   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सण उत्सवांवर सावट पसरले आहे.या परिस्थितीत पंढरपूर, आळंदी,देहु , पैठण यासह अन्य सर्वच तिर्थक्षेत्रात भरणार्या यात्रा रद्द करण्याची वेळ आली.पैठण येथील नाथषष्टी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिंड्या जातात.पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने ह.भ.प. गणेशमहाराज उखळीकर यांनी कोविड नियमांचे पालन करून गावातच  नाथषष्टी उत्सव केला व कोरोना परिस्थितीत शेकडो वर्षे चालत आलेली परंपरा जपली.           गेल्या अनेक वर्षांपासून श्रीसंत केदारी महाराज  उखळीकर संस्थानच्या मानाच्या दोन दिंड्या परंपरागत नाथषष्टीसाठी निघतात.ही शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे.मात्र गेल्या दोन वर्षांत जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सण उत्सवांवर सावट पसरले आहे. त्यामुळे दिंडी सोहळा रद्द करण्याची वेळ दिंडी चालकांवर आली आहे. परंतु आपली परंपरा खंडित होऊ नये यासाठीह.भ. पण.गणेशमह

MB NEWS-एकनाथराव कराळे यांचे निधन

इमेज
  एकनाथराव कराळे यांचे निधन परळी/प्रतिनिधी..... जुन्या परळीतील संत श्री. सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक वारकरी सांप्रदायाच्या चळवळीत अखेरपर्यंत कार्यरत राहिलेले एकनाथराव तात्याराव कराळे (वय ९०) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांचे वडील व माजी नगरसेविका जमुनाताई बालासाहेब कराळे यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने कराळे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी,तर बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी मंजूर*

इमेज
 *पंकजाताई आणि प्रितमताईं मुंडेंच्या प्रयत्नांना यश ; जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार* *परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी,तर बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी मंजूर* सीआरएफ अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले ७५ कोटी! बीड । दिनांक ०१ । केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने रस्ते विकासासाठी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.परळी-गंगाखेड मार्गासाठी दोनशे चोवीस कोटी रुपये,बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी छप्पन कोटी रुपये तर केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता,त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यानिमित्ताने मोठे यश आले आहे. बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून केली जात होती.शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ख

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली 'ऑनलाईन' वार्षिक सर्वसाधारण सभा* *'वैद्यनाथ' चे पुढील हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट* _*अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी केले पंकजाताई मुंडे यांचे कौतुक !*_

इमेज
 * पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली 'ऑनलाईन' वार्षिक सर्वसाधारण सभा*  *'वैद्यनाथ' चे पुढील हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट*  _*अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी केले पंकजाताई मुंडे यांचे कौतुक !*_ परळी वैजनाथ दि. 31......       वैद्यनाथ कारखाना हा बीड जिल्ह्याच्या बाजारपेठेचा आर्थिक कणा आहे. ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि कर्मचारी यांच्या हितासाठी वैयक्तिक नुकसान सहन करून कारखाना सुरू केला. माझ्या प्रयत्नाला सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याचे नियोजन असून असेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.            पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आज उत्साहात संपन्न झाली. अनेक सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना स

MB NEWS-ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प .केशव महाराज उखळीकर*

इमेज
 * पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँके चा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात संपन्न* * ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प . केशव महाराज उखळीकर* *पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खा.ओमराजे दादा निंबाळकर, वाल्मीकआन्ना कराड यांनी दिल्या शुभेच्छा* *परळी वैजनाथ प्रतिनिधी* परळी शहरात नव्यानेच रुजू झालेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी ली बँकेचा आज मंगळवार दि 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. आज मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी परळी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साई प्रेम आर्कड, शॉप नंबर 3 परळी वैजनाथ येथे पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून व फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर

MB NEWS-लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी* _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_

इमेज
 * लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*  _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_ बीड । दिनांक २६। लाॅकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणारांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे, तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय गै

MB NEWS-एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इमेज
  एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई परभणी.......         अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्वीकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे आज गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.         याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी️ 1 लाख रूपये लाच मागितली होती. यातील रेल्वे पोलीस हवालद

MB NEWS-लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

इमेज
  लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात ! कायदेभंगाचा गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत- आ.धस  आष्टी, प्रतिनिधी......       लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात उतरले आहेत.व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसाला लाॅकडाऊनचा प्रचंड त्रास होतो.यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध करत गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत असे आ.धस यांनी सांगितले.        याबाबत तहसीलदार यांना आ.सुरेश धस यांनी निवेदन दिले.लाॕकडाऊनला आ.सुरेश धस यांनी तीव्र विरोध करत व्यापा-यांसह निवेदन देण्यात आले.सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपुर्ण ताकदनिशी मी उभा आहे.वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्यांची मला सवय असल्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी यावेळी दिला आहे.

MB NEWS-लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक

इमेज
  लॉकडाऊनच्या  विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक बीड, प्रतिनिधी....     बीड जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.परंतु केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास व्यापारी संघटना निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.  सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना  बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. त्यांचा विचार न करता  सरळ लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक व्यापारी या गोष्टीमुळे परेशान होणार तर आहेच परंतु आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहेेत. जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस  व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत.आदेशात काही  व्यापार्‍यांना व्यवसाय करण

MB NEWS-बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश   बीड,दि.24(जि.मा.का.):- जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे  परवानगी शिवाय बीड जिल्हयात  प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्हयात  येणाऱ्या सर्व सिमा सिल, बंद करण्याचे निर्देश श्री. रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  मुभा देण्यात आलेल्या काहींना  वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या क

MB NEWS-बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी

इमेज
  बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी बीड.......       आज बीड अधीकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले की बीड जिल्ह्यात (दि.२५.०३.२०२१ च्या मध्यरात्रीपासून) दि.२६.०३.२०२१ ते ०४.०४.२०२१ बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन असेल असे आदेश जारी केले त्यामध्ये कोणता व्यवसाय चालु राहतील ते खालील प्रकारे आहे. १. सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपुर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील .  २. उपहारगृह , सर्व अनुज्ञप्त्या , रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल्स , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . ( कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण , नाष्टा , चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून )  ३. सर्व केशकर्तनालय / सलुन / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील .  ४. शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील .  ५. सार्वजनिक व

MB NEWS-बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन

इमेज
  बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन  बीड.....बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली करत असल्याने हा आकडा वाढतो आहे. बीड जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांचे दुकान सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने अखेर बुधवार पासून बीड जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप  यांनी घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. हा लॉक डाऊन 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांसाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे. यामुळे 25 मार्चला सायंकाळी ७ वाजता बंद केलेली दुकाने ५ अप्रीलाच उघडणार आहेत.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.