MB NEWS-एसआयओ व जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

 एसआयओ व जमाते इस्लामी हिंद  यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबीर


परळी वै.( प्रतिनिधी) दि. 10 एप्रिल 2021: महाराष्ट्रावर असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन जमाते ईस्लामि हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास एसआयओचे महाराष्ट्र साऊथ झोन प्रमुख सलमान खान साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरास तरूण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसआयओ व जमाते इस्लामि हिंद या  सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात  रक्तदान शिबीरांच्या आयोजनांचे सत्र सुरू आहे. सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती याप्रसंगी बोलताना सलमान खान यांनी दिली. आपल्या संदेशात पवित्र कुरआन चा दाखला देत ते म्हणाले,"तुम्ही एका मानवाला वाचवले, तर तुम्हाला संपुर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते." राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन जनतेला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे अशा भावना आयोजकांनी या वेळी व्यक्त केल्या. यावेळी परळीतील नागरीक, कर्मचारी, तरुणवर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत दुपारी 4 वाजेपर्यंत एकुण 50 युनिट रक्त संकलन करण्यात आले; वृत्तांता नंतरही रक्तदान सुरूच होते.


या शिबिरास  शकील मौलाना, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगर सेवक अजीज कच्ची, एमआयएम शहर अध्यक्ष अकबर कच्ची, जमाते इस्लामी हिंद जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तेखार सर, जमाते ईस्लामी हिन्द परळी अध्यक्ष  सय्यद अन्वर सर, एमपीजे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत अली, एसआयओ परळीचे अध्यक्ष जुनैद शेख, सचिव सय्यद तजम्मुल, शाहरुख खान, सय्यद उमेर, शेख मिन्हाजुद्दीन ,सय्यद अब्बास , शेख मुदस्सिर विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !