MB NEWS-कोरोना परिस्थितीत जपली परंपरा: पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने कोविड नियमांचे पालन करून गावातच केला नाथषष्टी उत्सव

कोरोना परिस्थितीत जपली परंपरा: पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने कोविड नियमांचे पालन करून गावातच केला नाथषष्टी उत्सव



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सण उत्सवांवर सावट पसरले आहे.या परिस्थितीत पंढरपूर, आळंदी,देहु , पैठण यासह अन्य सर्वच तिर्थक्षेत्रात भरणार्या यात्रा रद्द करण्याची वेळ आली.पैठण येथील नाथषष्टी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिंड्या जातात.पैठण दिंडी सोहळा रद्द झाल्याने ह.भ.प.गणेशमहाराज उखळीकर यांनी कोविड नियमांचे पालन करून गावातच  नाथषष्टी उत्सव केला व कोरोना परिस्थितीत शेकडो वर्षे चालत आलेली परंपरा जपली.

          गेल्या अनेक वर्षांपासून श्रीसंत केदारी महाराज  उखळीकर संस्थानच्या मानाच्या दोन दिंड्या परंपरागत नाथषष्टीसाठी निघतात.ही शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे.मात्र गेल्या दोन वर्षांत जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सण उत्सवांवर सावट पसरले आहे. त्यामुळे दिंडी सोहळा रद्द करण्याची वेळ दिंडी चालकांवर आली आहे. परंतु आपली परंपरा खंडित होऊ नये यासाठीह.भ. पण.गणेशमहाराज उखळीकर यांनी कोविड नियमांचे पालन करून गावातच  नाथषष्टी उत्सव केला व कोरोना परिस्थितीत शेकडो वर्षे चालत आलेली परंपरा जपली. दरवर्षी पैठण येथे ज्याप्रमाणे कार्यक्रम असतात त्याचप्रमाणे तीन दिवशिय षष्टीसोहळा साजरा करण्यात आला. कोविड नियमांचे पालन करून आपली परंपरा जतन करण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले.या मध्ये पारंपरिक पद्धतीने किर्तन,नाथषष्टी गुलाल उधळण व काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझरचा वापर व मास्कचा  वापर करत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार