MB NEWS-दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे* *पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन*

 *दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे*



*पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन*


परळी (दि. ०७) ---- : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  


जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन/व्हेंटिलेटर्स उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता भासणार नाही, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु या सगळ्या प्रयत्नांना जिल्ह्याच्या जनतेने नियमांचे पालन करून व आवश्यक काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.


सर्वत्र आरोग्य दूत आपले प्राण पणाला लावून कोरोना परिस्थितीशी लढा देत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, तसेच पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार